उत्तूर आठवडी बाजारास अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:27 AM2021-09-05T04:27:46+5:302021-09-05T04:27:46+5:30

उत्तूरला दर शनिवारी अठवडा बाजार भरतो. या बाजारात चिमणे, चव्हाणवाडी, बेडीव, सावतवाडी, अरळगुंडी, होन्याळी, धामणे, बहिरेवाडी, मुमेवाडी, आर्दाळ, हालेवाडी, ...

Short response to the North Week market | उत्तूर आठवडी बाजारास अल्प प्रतिसाद

उत्तूर आठवडी बाजारास अल्प प्रतिसाद

Next

उत्तूरला दर शनिवारी अठवडा बाजार भरतो. या बाजारात चिमणे, चव्हाणवाडी, बेडीव, सावतवाडी, अरळगुंडी, होन्याळी, धामणे, बहिरेवाडी, मुमेवाडी, आर्दाळ, हालेवाडी, महागोंड, वझरे, वडकशिवाले, पेंढारवाडी, जखेवाडी आदी परिसरातील ग्रामस्थ बाजाराला हजेरी लावतात. आठवडा बाजार भरणार असल्याने विक्रेते आले, मात्र ग्राहकांची उपस्थिती कमी होती. बाजार सुरू झाला मात्र ग्रामीण भागात बस व खासगी वाहतूक सुरू झाली नसल्याने बाजारपेठेत ग्राहक येऊ शकले नाहीत. पुढील शनिवारी गणपती सणाच्या निमित्ताने बाजारात विक्रेते व ग्राहक येण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्गाच्या सूचना पाळण्याच्या ग्राहक व विक्रेत्यांनी पाळण्याची गरज आहे.

नियमांचे पालन करा

आठवडा बाजार सुरू करण्यात आला असला तरी कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.

भैरू सावंत, सामाजिक कार्यकर्ता, उत्तूर

फोटो ओळी : उत्तूर (ता. आजरा) येथे आठवडा बाजार सुरू झाला, मात्र ग्राहकांनी कमी प्रतिसाद दिल्याने दिसून येते. छाया. रवींद्र येसादे

Web Title: Short response to the North Week market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.