संक्षिप्त वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:26 AM2021-02-24T04:26:39+5:302021-02-24T04:26:39+5:30

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे मार्च महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरासाठी शुक्रवारी (दि.२६) सकाळी अकरा वाजल्यापासून शिबिर व स्लॉट ...

Short story | संक्षिप्त वृत्त

संक्षिप्त वृत्त

Next

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे मार्च महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरासाठी शुक्रवारी (दि.२६) सकाळी अकरा वाजल्यापासून शिबिर व स्लॉट सोडण्यात येणार आहे तरी संबंधित तालुक्याच्या ठिकाणासाठी नागरिकांनी या दिवशी अपॉईंमेंट घ्यावी व या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.

----

डाक अदालत २२ मार्च रोजी

कोल्हापूर : मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबईद्वारे २२ मार्चला कार्यालयामध्ये डाक अदालतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल, तरी संबंधितांनी आपली तक्रार एच. एम. मंजेश, सहायक निर्देशक डाकसेवा (ज.शि.) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, मुंबई जी.पी.ओ. इमारत, दुसरा माळा, मुंबई ४००००१ यांच्या नावे दोन प्रतीसह ५ मार्चपर्यंत पोहोचेल अशारितीने पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

--

Web Title: Short story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.