संक्षिप्त वृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:23 AM2021-04-02T04:23:27+5:302021-04-02T04:23:27+5:30
कोल्हापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अखत्यारितील सैनिकी मुला-मुलींचे वसतिगृह, महासैनिक दरबार हॉल व लॉनकरिता वसतिगृह अधीक्षक, सफाई ...
कोल्हापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अखत्यारितील सैनिकी मुला-मुलींचे वसतिगृह, महासैनिक दरबार हॉल व लॉनकरिता वसतिगृह अधीक्षक, सफाई कामगार व पहारेकरी ही पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत. तरी इच्छुकांनी आपले अर्ज ९ एप्रिलपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल प्रदीप ढोले यांनी केले आहे.
ही पदे कंत्राटी पध्दतीची व एकत्रित मानधनावर असून माजी सैनिक, माजी सैनिक विधवांना प्रथमप्राधान्य देण्यात येईल. वसतिगृह अधीक्षक पदासाठी उमेदवार सैन्य सेवेत जे.सी.ओ. रँकचा असावा. सफाई कामगार पदासाठी स्त्री, पुरुष व पहारेकरी पदांसाठी पुरुष उमेदवारांनी अर्ज करावयाचे आहेत.
---
महाडीबीटी प्रणालीवर अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ
कोल्हापूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालय स्तरावर अद्यापही मोठ्या संख्येने प्रलंबित असल्याने शासनस्तरावरून महाडीबीटी प्रणालीवर अर्ज स्वीकारण्यास १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली.
संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांच्या अर्जांबाबत स्वीकृतीची कार्यवाही तात्काळ करावी, विद्यार्थ्यांचे छाननी केलेले अर्ज महाविद्यालयांनी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयास ऑनलाईनरित्या सादर करावेत. महाबीटी ऑनलाईन प्रणालीमधून महाविद्यालयास देय असणारे शिक्षण शुल्क जमा केले जाईल. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी आकारणी करू नये. विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहिले, तर अशा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत महाविद्यालय जबाबदार राहील, असेही नमूद करण्यात आले आहे.
--