संक्षिप्त वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:23 AM2021-04-18T04:23:19+5:302021-04-18T04:23:19+5:30

कोल्हापूर : येथील आम आदमी पक्ष युवा आघाडीतर्फे स्वयंअध्ययन उपक्रम घेण्यात आला. याअंतर्गत विद्यार्थ्यांपर्यंत स्वयंअध्ययनाचे महत्त्व पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात ...

Short story | संक्षिप्त वृत्त

संक्षिप्त वृत्त

Next

कोल्हापूर : येथील आम आदमी पक्ष युवा आघाडीतर्फे स्वयंअध्ययन उपक्रम घेण्यात आला. याअंतर्गत विद्यार्थ्यांपर्यंत स्वयंअध्ययनाचे महत्त्व पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

यात जिल्हा युवा अध्यक्ष उत्तम पाटील, उपाध्यक्ष आदम शेख, शहर युवाध्यक्ष मोईन मोकाशी, पौर्णिमा निंबाळकर, प्रथमेश सूर्यवंशी, विजय हेगडे, बसवराज हदीमनी, राकेश व्हटकर, राज कोरगावकर, सुयश जगताप, चेतन चौगुले, विशाल वठारे यांनी सहभाग घेतला.

--

विज्ञान आपल्या भेटीला उपक्रम

कोल्हापूर : येथील न्यू हायस्कूलच्या वतीने विज्ञान आपल्या भेटीला हा उपक्रम घेण्यात आला. संस्थेचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

याअंतर्गत प्रयोगशाळेत विविध उपकरणे व रसायने यांची मांडणी करण्यात आली. तसेच विविध प्राण्यांचे नमूने, प्रतिकृती, माहिती तक्ते, खजिने, धातू, अधातूंचे नमूने, सूक्ष्मदर्शक, टेलिस्कोप, फिल्म प्रोजेक्टर, आर्किमिजिडचे प्रयोग, इलेक्टोलिसिस, चुंबकाचे प्रयोग याची माहिती प्रदर्शनात देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक के. ई. पवार, एच.बी. खानविलकर, प्रदीप पोवार उपस्थित होते.

--

कचरावेचक गटांना सामावून घ्या

कोल्हापूर : कोरोनामुळे कचरावेचक बचतगटांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला असून त्यांना कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावून घ्यावे, अशी मागणी अवनी संस्थेने केली आहे. यााबाबतचे निवेदन उपायुक्त निखिल मोरे यांना दिले.

यावेळी २०१६ च्या घनकचरा व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी करावी, कचरावेचकांचा सर्व्हे करून त्यांना ओळखपत्र द्यावे, या महिलांना एनयूएलएम अंतर्गत प्रशिक्षण द्यावे व व्यवसायासाठी कर्ज मिळावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

---

Web Title: Short story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.