संक्षिप्त वृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:24 AM2021-04-22T04:24:17+5:302021-04-22T04:24:17+5:30
जयसिंगपूर : शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. अकराव्या गल्लीत ...
जयसिंगपूर : शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. अकराव्या गल्लीत भटक्या कुत्र्यांच्या झुंडी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. पालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
--------------
-
पंचगंगा प्रदूषण प्रश्न कायम
शिरोळ : येथील बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी दाखल झाले असले तरी पाण्याला उग्र वास येत आहे. जलपर्णी पाण्याबरोबर वाहून जात असली तरी प्रदूषणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. हे दुर्गंधीयुक्त पाणी शेतीला दिले जाते. त्यामुळे पिकावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
-------------------
हेरवाडमध्ये एटीएमचे उद्घाटन
कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथे एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. बसस्थानक चौकात हे एटीएम मशीन बसविण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गावामध्ये एटीएमची मागणी होत होती. यानिमित्ताने ती मागणी पूर्ण झाली असल्याची भावना ग्रामस्थांतून होत आहे.