संक्षिप्त वृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:38 AM2020-12-16T04:38:06+5:302020-12-16T04:38:06+5:30
जयसिंगपूर : कुटवाड (ता. शिरोळ) येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी रक्तदात्याला वृक्षांची रोपे भेट देण्यात ...
जयसिंगपूर : कुटवाड (ता. शिरोळ) येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी रक्तदात्याला वृक्षांची रोपे भेट देण्यात आली. यावेळी ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले तर १५० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी ४० वेळा रक्तदान करणारे भारत चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. अभिनंदन मोरे, रावसाहेब देसाई, विनायक माईनकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------
विशाल जाधव यांची निवड
उदगांव : येथील विशाल खंडेराव जाधव यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिरोळ तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली. निवडीचे पत्र राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील-टाकवडेकर यांनी दिले. यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, दशरथ काळे, आण्णासाहेब क्वाणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो - १५१२२०२०-जेएवाय-०४-विशाल जाधव
--------------------
-
मिनाज जमादार यांची निवड
शिरोळ : शिरोळ तालुका राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी पंचायत समिती सदस्या मिनाज युनुसअली जमादार यांची निवड करण्यात आली. दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्याहस्ते जमादार यांना निवडीचे पत्र देण्यात आले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा सुप्रिया साळोखे यांनी जमादार यांची नियुक्ती केली. यावेळी सर्जेराव शिंदे, दिलीप पाटील, रणजितसिंह पाटील, महेंद्र बागे, दामोदर सुतार, मफत पाटील, अशोक कोळेकर, शेखर पाटील, नितीन बागे, फैसल पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो - १५१२२०२०-जेएवाय-०५-मिनाज जमादार
-----------------
पैशांचे पाकीट प्रामाणिकपणे केले परत
कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील अशोक सिदनाळे यांच्या खिशातून पडलेले पैशांचे पाकीट व कागदपत्रे चंदूर (ता. हातकणंगले) महिलेला सापडली होती. कागदपत्रांवरील पत्ता शोधत संबंधित महिलेने रोख रकमेसह कागदपत्रे स्वत:हून येऊन परत केली. तिच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक होत आहे. सिदनाळे हे इचलकरंजी-चंदूर या मार्गावरून कामावरुन जात असताना त्यांच्या खिशातील पैशांचे पाकीट चंदुर आभार फाटा येथे पडले होते. पाकिटात आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम कार्ड व तेराशे रुपये होते.