संक्षिप्त वृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:37+5:302021-07-02T04:16:37+5:30
कोल्हापूर : जूनमध्ये संपणाऱ्या ई-आर-१ (त्रैमासिक) या सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची माहिती संकलीत करण्याचे ...
कोल्हापूर : जूनमध्ये संपणाऱ्या ई-आर-१ (त्रैमासिक) या सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम सुरू आहे. यासाठी विभागाच्या वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने ३१ जुलैपर्यंत माहिती भरावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे. माहिती भरण्यासाठी कार्यालयाकडून यापूर्वीच युझरनेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. सर्व आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयाचे ई-आर-१ विवरणपत्र ऑनलाईन www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भरावे.
काव्यलेखन स्पर्धेत दीपक कुंभार प्रथम
कोल्हापूर : मराठी असे आमुची मायबोली, माशेल, गोवा आयोजित अखिल भारतीय मराठी काव्यलेखन स्पर्धेत येथील दीपक भाऊ कुंभार यांच्या व्हय रं बा या कवितेला गोव्याबाहेरील गटामध्ये प्रथम क्रमांक मिळाला.
त्यांना ५ हजार रुपये रोख, मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी २८२ कवींनी कविता पाठवल्या होत्या. दीपक कुंभार हे स. म. लोहिया हायस्कूलमध्ये शिक्षक असून त्यांना मुख्याध्यापक एस. एस. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
------
फोटो नं ०१०७२०२१-कोल-दीपक कुंभार
---