सुसज्ज ‘सावित्रीबाई’मध्ये डॉक्टरांची कमतरता : रुग्णसेवा करताना धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:13 AM2018-10-25T00:13:13+5:302018-10-25T00:15:11+5:30
सर्वसामान्यांना दर्जेदार रुग्णसेवा देण्याच्या उद्देशाने सध्या सावित्रीबाई फुले रुग्णालय लाखो रुपये खर्चून सुसज्ज केले आहे, पण तज्ज्ञ डॉक्टरांसह इतर स्टाफ नेमण्याकडे मात्र महापालिका प्रशासनाचा कानाडोळा होत आहे. अपुºया कर्मचाºयांच्या संख्याबळावर हे रुग्णालय चालविण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रशासनाकडून होत
तानाजी पोवार ।
कोल्हापूर : सर्वसामान्यांना दर्जेदार रुग्णसेवा देण्याच्या उद्देशाने सध्या सावित्रीबाई फुले रुग्णालय लाखो रुपये खर्चून सुसज्ज केले आहे, पण तज्ज्ञ डॉक्टरांसह इतर स्टाफ नेमण्याकडे मात्र महापालिका प्रशासनाचा कानाडोळा होत आहे. अपुºया कर्मचाºयांच्या संख्याबळावर हे रुग्णालय चालविण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. त्यामुळे रुग्णसेवा देताना धावपळ होत असून, त्यातूनच येथील कर्मचारी आणि रुग्णांच्यात नेहमीच वादावादी होत आहे.
महापालिकेतर्फे सावित्रीबाई फुले रुग्णालय, सावित्रीबाई फुले सुतिकागृह, पंचगंगा आणि आयसोलेशन रुग्णालय ही प्रमुख रुग्णालये, तर रक्तपेढी व फिजिओथेरपी सेंटर, वॉर्ड दवाखाने, नागरी आरोग्य केंद्रेही चालविली जातात.
अलीकडच्या काळात मनपाचे सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडे दुर्लक्ष झाल्याने तेथे सुविधांचा अभाव होता. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याने अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती. त्याची दखल घेऊन महापालिकेने अतिदक्षता विभाग सुरू केला असून, अत्याधुनिक सर्जिकल विभागही सज्ज आहे. सर्जिकल इमारतीत मेडिकल, सर्जिकल, ओपीडी, लॅब, एक्स-रे हे विभाग कार्यरत असून, पूर्वेकडील सुतिकागृहाच्या इमारतीत बालविभाग, प्रसूती विभाग, ओपीडी, गर्भवती तपासणी, औषध विभाग, अतिदक्षता हे विभाग आहेत.
सहा महिने शस्त्रक्रिया बंदच
सर्जिकल विभाग लाखो रुपये खर्चून सुसज्ज केला आहे; पण तो सुरू कधी होणार याचीच प्रतीक्षा आहे. गेले सहा महिने येथे रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे बंदच आहे. शस्त्रक्रियेसाठीचे रुग्ण ‘सीपीआर’मध्ये पाठविले जातात.
रुग्ण, कर्मचारी वादावादी
प्रत्येक विभागात शिफ्टमध्ये एक सिस्टर, एक वॉर्डबाय व एक आया असल्याने त्यांच्यावर संपूर्ण विभागाचा भार न पेलावणारा असल्याने रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचाºयांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. संपलेले सलाईन बदलण्याचे कामही वॉर्डबॉयकडूनच होते.
आरोग्याधिकाºयांनीच उचलला स्ट्रेचर
चार दिवसांपूर्वी रेकॉर्ड विभागातील कागदपत्रे स्ट्रेचरवर ठेवून दुसºया ठिकाणी शिफ्टिंग करताना वॉर्डबॉयची संख्या अपुरी असल्यामुळे तो स्ट्रेचर उचलण्याची वेळ स्वत: आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांच्यावर आली.
शिकाऊ डॉक्टरांवर अतिदक्षताची मदार
अतिदक्षता विभागात दिवसभर डॉक्टर दिसतात; पण रात्री येथे शिकाऊ डॉक्टर असतात. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत डॉक्टरांची एकूण ५८ मंजूर पदे असून, त्यापैकी कायम सेवेतील १८, तर हंगामी २० जण सेवेत आहेत. ‘सर्जिकल’च्या इमारतीतील पाच विभागांसाठी ८ सिस्टर, ६ वॉर्डबॉय, ८ आया आहेत. तर बालविभागाच्या मुख्य इमारतीतील पाच विभागांत १७ सिस्टर, ७ वॉर्डबॉय, १५ आया आहेत, तर दोन्हीही इमारतीत एकूण दोनच वॉचमन आहेत. हे सर्व कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करतात.
एकाची साप्ताहिक सुट्टी, रजा दिल्यास यंत्रणा कोलमडते. सकाळी ओपीडीच्यावेळी पुरेशी संख्या असते; पण त्यानंतर येथे डॉक्टरांना व कर्मचाºयांना शोधावे लागते.महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील सर्जिकल विभाग सुसज्ज केला आहे; पण तो कधी सुरू होणार याचीच प्रतीक्षा लागून राहिली आहे.
सावित्रीबाई फुलेसह सर्वच रुग्णालये सुसज्ज करण्याची कार्यवाही सुरू आहे; पण डॉक्टर आणि इतर कर्मचाºयांची संख्या अपुरी आहे. रिक्त जागा भरतीसाठी आयुक्तांशी चर्चा केली आहे.
- डॉ. दिलीप पाटील, आरोग्याधिकारी, को.म.न. पा.