सिद्धार्थनगरात घरामध्ये शॉट सर्किटने आग
By admin | Published: March 30, 2017 02:49 PM2017-03-30T14:49:35+5:302017-03-30T14:49:35+5:30
प्रांपचिक साहित्य खाक
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : सिद्धार्थनगर येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत प्रांपाचिक साहित्य खाक झाले. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. हा प्रकार समजताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी आले. जवानांनी पाण्याचा फवारा मारुन आग विझवली.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, सिद्धार्थनगर येथे भारती निळकंठ कांबळे यांचे कौलारु घर आहे. त्या सीपीआरमध्ये कामास आहेत. घरामध्ये त्या व त्यांचा मुलगा अमित असे दोघेजण राहतात. गुरुवारी दूपारी त्यांच्या घराला कुलूप होते. त्यावेळी शॉटसर्किटने त्यांच्या घराला आग लागली. शेजारीच राहणाऱ्या सुरक्षा सोहनी आणि अतुल गवई यांना ही आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ बादलीतून पाणी मारण्यास सुरुवात केली.
आग लागल्याचे समजताच नागरिकांनी गर्दी वाढली. नागरिकांनी हा प्रकार सिद्धार्थनगर कमानीजवळ थांबलेल्या अमित कांबळे यांना सांगितला. त्यानुसार ते तातडीने घराजवळ आले. त्यांनी अग्निशमन दलाला फोनवरुन याची माहिती दिली. त्यानुसार दलाचे दोन बंब घटनास्थळी आले. जवानांनी पाण्याचा फवारा मारुन सुमारे तासाभरानंतर ही आग आटोक्यात आणली. या आगीत सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे प्रांपचिक साहित्याचे नुकसान झाल्याचे अमित कांबळे यांनी पत्रकारांना सांगितले.