नारायण राणे यांचे राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिस अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 01:17 PM2017-12-08T13:17:38+5:302017-12-08T14:08:36+5:30
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा घेण्यासाठी कोल्हापूरात आलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी येथील एका हॉटेलमध्ये सकाळी भेट घेतली. दरम्यान, ही भेट घरगुती असून यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये असे महाडिक म्हणाले.
कोल्हापूर : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नारायण राणे यानी शुक्रवारी कसबा बावडा येथील राजर्षि शाहू जन्मस्थळ येथे राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीस अभिवादन केले.
माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांच्यासोबत माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत,व इतर उपस्थित होते.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा घेण्यासाठी कोल्हापूरात आलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी येथील एका हॉटेलमध्ये सकाळी भेट घेतली. दरम्यान, ही भेट घरगुती असून यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये असे महाडिक म्हणाले.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची पक्ष स्थापनेनंतरची पहिलीच जाहीर सभा कोल्हापूर येथे आज, शुक्रवार दि. ८ रोजी होत आहे.
या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागून राहिले असतानाच पंचशील हॉटेल समोर नारायण राणे यांच्या स्वागतासाठी उभी केलेली कमान उभी अचानक पडली. ही कमान रस्त्यावरून जाणाऱ्या एक तरुणांच्या अंगावर पडली. मात्र, त्याला कोणतीही दुखापत झाली नाही, असे ही घटना पाहणाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील एका हॉटेलमध्ये उतरलेल्या नारायण राणे यांची खासदार धनंजय महाडिक यांनी भेट घेतली. २00४ पासून महाडिक परिवाराशी नारायण राणे आणि कुटूंबियांशी संबंध आहेत. राणे हे कोल्हापूरात आले असल्यामुळे त्यांची भेट घेणे अगत्याचे होते. त्यांचा आणि महाडिक परिवाराचा घरगुती स्वरुपाचा संबंध असल्यामुळे यातून कोणीही राजकीय अर्थ काढू नये, असे धनंजय महाडिक म्हणाले.