गैरहजर १३ शिक्षकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:33 AM2021-02-27T04:33:06+5:302021-02-27T04:33:06+5:30
मलकापूर : शाहूवाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडील शाळेत विनाकारण गैरहजर राहणाऱ्या १३ प्राथमिक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे; ...
मलकापूर : शाहूवाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडील शाळेत विनाकारण गैरहजर राहणाऱ्या १३ प्राथमिक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे; तर चार शिक्षकांची बिनपगारी रजा केल्याची महिती प्रभारी गटशिक्षण अधिकारी उदय सरनाईक यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी पंचायत समितीचे सभापती विजय खोत, प्रभारी गटशिक्षण अधिकारी उदय सरनाईक तालुक्यातील डोंगरकपारीत असणाऱ्या प्राथमिक शाळांना अचानक भेटी दिल्या. या भेटींत शिक्षक शाळेत गेलेले नाहीत. शाळाच उघडली नाही. रजा न घेताच शिक्षक गैरहजर आढळून आले. तर काही शिक्षक दुपारी चार वाजता शाळा बंद करून गायब झाले. अशा शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, काहीना बिनपगारी शिक्षा दिली आहे. तर काहींचे दप्तर जप्त करण्यात आले आहे
राजू जरग, वनिता माळी, ज्योती जायभाय, माधुरी पोतदार, सुनीता डोंगरे, बंडोबा गोळवे, अंकुश पाटील, रवींद्र टुसे, तानाजी वाघमोडे, रोहिदास कोकाटे, नंदकुमार कांबळे, महादेवी कुंभार, श्री जाधव या शिक्षकांवर कारवाई झाली आहे. मद्यपान करणाऱ्या पाच शिक्षकांवर कारवाई सुरू आहे.