करपेवाडी, झुलपेवाडीच्या सचिवास कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:16 AM2021-06-22T04:16:47+5:302021-06-22T04:16:47+5:30
खवरे यांच्याकडे बलभीम विकास सेवा संस्था झुलपेवाडी व कर्पेवाडी विकास सेवा संस्था करपेवाडी या दोन्ही गावांचे सेवा संस्थेचे सचिव ...
खवरे यांच्याकडे बलभीम विकास सेवा संस्था झुलपेवाडी व कर्पेवाडी विकास सेवा संस्था करपेवाडी या दोन्ही गावांचे सेवा संस्थेचे सचिव म्हणून काम पाहत होते.
बँक निरीक्षक शाखा उत्तूर यांनी १४ मे २०२१ रोजीच्या पत्रानुसार सचिव यांनी झुलपेवाडी सेवा संस्थेची २०२०-२१ संस्था दप्तर तपासणी पूर्ण झालेली नाही. संस्थेचे बँकेमधील अॅडव्हाईस् व ऊस बिल रक्कम कपात करून घेतल्या नाहीत. सूचना देऊनही दुर्लक्ष करण्यात आले. संस्थेचे दप्तरही व्यवस्थित ठेवले नाही. त्यामुळे पात्र खातेदारांना वेळेवर कर्जपुरवठा करण्यात अडचणी आल्यास आपण स्वत: जबाबदार असे कळवूनही दुर्लक्ष केले.
संस्थेकडे कधीही येत नाहीत. संस्थेचे कामकाज पूर्ण नसून संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचे दप्तर नाही. संस्थेत संचालकांच्या मीटिंगा होत नसल्याने शेतकरी सभासदांना वेळेवर कर्जपुरवठा करता येत नाही. संस्थेकडे सभासदांकडून भरणा केलेली कोणतीही पावती सभासदांना दिल्या नाहीत. सचिव गैरहजर असल्याने कर्ज घेणे व वसुली करणे गैरसोयीचे होत आहे.
संस्थेचे कामकाज पूर्ण करण्याची जबाबदारी सचिवांवर असून, ती पूर्ण न केल्याने संस्था व सभासद यांचे नुकसान झाले असून, १५ दिवसांत म्हणणे सादर करावे अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला आहे.