स्वार्थी विरोधकांना जागा दाखवा : नरके

By admin | Published: December 25, 2015 11:05 PM2015-12-25T23:05:51+5:302015-12-26T00:08:21+5:30

वीज विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने आगामी चार वर्षांत हा प्रकल्प कर्जमुक्त होईल.

Show the seats to selfish opponents: hell | स्वार्थी विरोधकांना जागा दाखवा : नरके

स्वार्थी विरोधकांना जागा दाखवा : नरके

Next

कोल्हापूर : सहवीज प्रकल्पामुळे कारखान्याचे पत्रे शिल्लक राहणार नाहीत, अशी टीका करणाऱ्या विरोधकांनी कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत प्रकल्प आदर्शवत झाल्याबद्दल आमचे अभिनंदन केले. आता निवडणुकीत पुन्हा ते आरोप करीत सुटले आहेत. अशा स्वार्थी विरोधकांना सभासदांनी जागा दाखवावी, असे आवाहन आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. कुंभी-कासारी साखर कारखाना निवडणूक प्रचारार्थ खुपिरे (ता. करवीर) येथे सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘कुंभी’चे माजी उपाध्यक्ष पांडुरंग रामजी पाटील होते. विठ्ठल व दत्त सहकार समूहाचे नेते तुकाराम पाटील हे प्रमुख उपस्थित होते. आमदार नरके म्हणाले, सहवीज प्रकल्पाला दोनशे कोटी खर्च येणार असे ‘बचाव मंच’वाले सांगत होते; पण आम्ही १३६ कोटींचा प्रकल्प अवघ्या ११५ कोटींत उभा करून सभासदांचे २१ कोटी वाचविले. वीज विक्रीसाठी टॉवर उभे करताना कमी अंतरात जोडणी करण्यासाठी आमदारकीचा उपयोग करून सात कोटी वाचविले. वीज विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने आगामी चार वर्षांत हा प्रकल्प कर्जमुक्त होईल. सध्या कारखान्याकडे ५३ कोटींची साखर शिल्लक असून ३८ कोटींचे साखर तारण कर्ज आहे. साखर विक्रीतून कर्ज वजा गेल्यानंतर कारखान्याकडे निव्वळ १५ कोटी रुपये शिल्लक राहणार असल्याने विरोधकांचा कर्जबाजारीपणाचा आरोप धादांत खोटा असल्याचेही आमदार नरके यांनी सांगितले. आकाराम पाटील म्हणाले, कारखाना चांगला चालविण्याची नरके घराण्याची परंपरा आहे. काही कारणांमुळे गेल्या निवडणुकीत आमदार नरके यांच्या विरोधात गेलो; पण आता ‘विठ्ठल’ व ‘दत्त’ समूहाने मार्गदर्शक तुकाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नरके पॅनेलला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. संजय डी. पाटील, युवराज पाटील, शिवाजी गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. टोलमुक्तीमध्ये योगदान दिल्याबद्दल सरपंच प्रकाश चौगले यांच्या हस्ते आमदार नरके यांचा सत्कार करण्यात आला. कुंभी बॅँकेचे अध्यक्ष अजित नरके, शिंदेवाडीच्या सरपंच उज्ज्वला शिंदे, साबळेवाडीचे सरपंच तानाजी पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य एस. आर. पाटील, बाजीराव पाटील, तानाजी आंग्रे, आनंदा कृष्णा पाटील, सुभाना निकम, संजय पाटील, के. डी. पाटील, मारुती कांबळे, आनंदा जगदाळे, श्रीपती पाटील, एस. डी. पाटील, अर्जुन पाटील उपस्थित होते.

Web Title: Show the seats to selfish opponents: hell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.