अभियान कसे राबवायचे हे राज्याला दाखवून देवू! हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2023 09:06 AM2023-06-18T09:06:06+5:302023-06-18T09:06:49+5:30

'शासन आपल्या दारी'साठी कागलमध्ये, शनिवारपासून खास मोहीम.

show the state how to implement the campaign said hasan mushrif | अभियान कसे राबवायचे हे राज्याला दाखवून देवू! हसन मुश्रीफ

अभियान कसे राबवायचे हे राज्याला दाखवून देवू! हसन मुश्रीफ

googlenewsNext

गडहिंग्लज : महाविकास आघाडीच्या 'महाराजस्व अभियानाला'च शिंदे - फडणवीस सरकारने 'शासन आपल्या दारी'हे नाव दिले आहे. परंतु,यातील विविध योजनांचा लाभ आपण कागल मतदारसंघातील ७० टक्के लाभार्थ्यांना यापूर्वीच मिळवून दिला आहे.१२४ गावातील उर्वरित लाभार्थ्यांनाही त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी येत्या शनिवारपासून खास मोहीम राबवणार आहोत.यातून शासकीय अभियान कसे राबवायचे असते हे राज्याला दाखवून देणार आहोत, अशी माहिती माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

बेळगुंदी येथे १० कोटींच्या विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासात राज्यात 'बारामतीनंतर कागल'चाच नंबर लागतो,असा दावाही त्यांनी केला. मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांनी आंबेओहोळ प्रकल्पाच्या पाणी पुरेपूर वापरावे,त्यासाठी सेनापती संताजी घोरपडे व गडहिंग्लज कारखानाही मदत करेल.परंतू, उपलब्ध पाणी न वापरल्यास ते 'चित्री'च्या लाभक्षेत्रातून पुढे कर्नाटकात जाईल.

यावेळी सरपंच तानाजी रानगे,माजी जि.प.उपाध्यक्ष सतीश पाटील,उदय जोशी, आशा पोवार यांचीही भाषणे झाली.मिलिंद मगदूम यांनी प्रास्ताविक केले.आण्णासाहेब कानडे यांनी आभार मानले.

अभियानातूनच  'कल्याणकारी योजना'..!

कागल पंचायत समिती सभापतीपदाच्या कारकिर्दीत "सभापती आपल्या दारी",  आमदार झाल्यावर "आमदार आपल्या दारी" मंत्री झाल्यानंतर "मंत्री आपल्या दारी" ही मोहीम आपण राबवली.यातील अनुभवातूनच  गोरगरीबांच्या भल्याच्या अनेक योजना आपण राज्यभर राबवल्या,असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

अभियानाच्या खर्चासाठी २० लाख!

शनिवारपासून (२४)'शासन आपल्या दारी'अभियानाला उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघापासून सुरुवात होईल. कागल मतदारसंघातील ५ मतदार संघासह कागल, गडहिंग्लज व  मुरगुड या शहरात स्वतंत्रपणे हे अभियान राबवले जाईल.त्याच्या खर्चासाठी आपल्या आमदार फंडातून २० लाखांचा निधी वापरण्याचे पत्रही आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे,असेही मुश्रीफांनी सांगितले.

बेळगुंदीत १० कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण

बेळगुंदी येथील १० कोटींच्या विविध विकासकामांचे लोकार्पण मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
 

Web Title: show the state how to implement the campaign said hasan mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.