जिल्हा बँकेच्या सभेत सवलतींचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:45 AM2021-02-06T04:45:27+5:302021-02-06T04:45:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शुक्रवारी झालेल्या ८२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास ...

A shower of concessions at the District Bank meeting | जिल्हा बँकेच्या सभेत सवलतींचा वर्षाव

जिल्हा बँकेच्या सभेत सवलतींचा वर्षाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शुक्रवारी झालेल्या ८२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी संस्थांवर सवलतींचा अक्षरश: वर्षाव केला. त्याचबरोबर थकबाकीदारांना कर्जमाफी दिली. आता नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची घोषणाही त्यांनी केली.

प्रास्ताविकामध्ये बँकेचे अध्यक्ष, मंत्री हसन मुश्रीफ यांनी बचत गटांना कर्ज व्याज सवलत देणार असल्याचे सांगितले. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून केलेल्या कर्जपुरवठ्याची वसुली चांगली असल्याने आगामी काळात त्यांना विनाअट कर्जपुरवठा केला जाईल. त्याचबरोबर ‘माझा व्यवसाय - माझा हक्क’या उद्योग विभागाच्या अभिनव उपक्रमास कर्जपुरवठा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. साखर कारखान्यांना कर्जावर एक टक्का व्याज सलवत देणार आहे. शेळ्यामेंढ्या संस्थांना व्याजदरात सवलत देण्याची घोषणाही त्यांनी केली. जिल्हा बँकेकडून घेतलेल्या शैक्षणिक कर्जावरील व्याज बँकेने द्यावे, अशी मागणी केली. यावर सकारात्मक विचार करण्याची ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

आजरा घनसाळसाठी वाढीव कर्ज

‘आजरा घनसाळ’ उत्पादक शेतकऱ्यांना कमी कर्जपुरवठा केला जातो, तो वाढवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावर वाढीव कर्ज देण्याचे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिले.

तिरंगी हार घालून सत्कार

संस्था व कर्मचारी संघटनांच्या वतीने अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्यासह संचालक मंडळाचा मोठा तिरंगी हार घालून सत्कार करण्यात आला.

मुश्रीफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

गेल्या पाच वर्षांत हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वखाली जिल्हा बँकेच्या प्रगतीची झेप व संस्थांना दिलेले बळ पाहून गटसचिव, कर्मचारी संघटना व शेतकऱ्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

Web Title: A shower of concessions at the District Bank meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.