सातव्या वेतन आयोगासाठी कृषी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे श्रमदान आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 07:07 PM2020-10-27T19:07:04+5:302020-10-27T19:10:11+5:30

Agriculture Sector,7th pay commission, kolhapurnews, college आश्वासित प्रगती योजनेसहित सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी कृषी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सामूहिक श्रमदान आंदोलन केले. त्यांनी काळ्या फिती लावून काम केले.

Shramdan agitation of agricultural college employees for 7th pay commission | सातव्या वेतन आयोगासाठी कृषी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे श्रमदान आंदोलन

कोल्हापुरात मंगळवारी आश्वासित प्रगती योजनेसहित सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी कृषी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सामूहिक श्रमदान आंदोलन केले.

Next
ठळक मुद्देसातव्या वेतन आयोगासाठी कृषी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे श्रमदान आंदोलन काळ्या फिती लावून काम : सहयोगी अधिष्ठातांना निवेदन

 कोल्हापूर : आश्वासित प्रगती योजनेसहित सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी कृषी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सामूहिक श्रमदान आंदोलन केले. त्यांनी काळ्या फिती लावून काम केले.

या मागणीसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कर्मचारी समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनास वेळोवेळी निवेदने दिली आहेत. मात्र, १०, २० आणि ३० वर्षांनंतर अनुज्ञेय ठरणारी तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसहित सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलेला नाही. त्यामुळे कृषी विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून आंदोलन सुरू केले.

त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, शेंडा पार्क येथील राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र, गूळ व ऊस संशोधन केंद्र, कसबा बावडा येथील कृषी तंत्र विद्यालयातील सुमारे २५० अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. त्यांनी काळ्या फिती लावून आणि श्रमदान करून आंदोलन केले.

 

Web Title: Shramdan agitation of agricultural college employees for 7th pay commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.