नृसिंहवाडीत श्रावण पौर्णिमा भाविकांविनाच साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:25 AM2021-08-23T04:25:59+5:302021-08-23T04:25:59+5:30
येथील दत्त मंदिरात पहाटे पाच वाजता काकड आरती, सकाळी सात वाजता रुद्र एकादशी, दुपारी साडेबारा वाजता श्रींचे चरण कमलावर ...
येथील दत्त मंदिरात पहाटे पाच वाजता काकड आरती, सकाळी सात वाजता रुद्र एकादशी, दुपारी साडेबारा वाजता श्रींचे चरण कमलावर महापूजा, दुपारी तीन वाजता पवमान पंचसूक्त पठण, सायंकाळी सातनंतर धूप, दीप, आरती, धावे व करुणात्रिपदीचे पठण होऊन रात्र शेजारती संपन्न झाली.
नुकत्याच महापुरातून सावरलेल्या व्यापाऱ्यांना नारळी पौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी होईल व व्यापार होईल, अशी आशा लागली होती. मात्र, प्रशासनाच्या यात्रा बंदच्या या निर्णयामुळे येथील व्यापारी निराश झाले.
फोटो - २२०८२०२१-जेएवाय-०८
फोटो ओळ - श्रावण पौर्णिमेनिमित्त श्रींची बांधण्यात आलेली महापूजा, तर दुसऱ्या छायाचित्रात नृसिंहवाडी येथील स्वागत कमानी जवळच बॅरिकेड्स लावून मार्ग बंद करण्यात आला होता. (छाया-प्रशांत कोडणीकर, नृसिंहवाडी)