श्रवणबेळगोळ : भगवान बाहुबली महामस्ताकाभिषेक सोहळा, ४०० त्यागींचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 04:16 AM2018-02-03T04:16:59+5:302018-02-03T04:17:18+5:30

जगभरातील जैन बांधवांचे श्रद्धास्थान असणाºया श्रवणबेळगोळ ( कर्नाटक) येथील भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक महोत्सवासाठी आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक त्यागींचे आगमनही झाले आहे.

Shravanabelalgola: Lord Bahubali Mahamastakabhishek Souza, 400 Advent | श्रवणबेळगोळ : भगवान बाहुबली महामस्ताकाभिषेक सोहळा, ४०० त्यागींचे आगमन

श्रवणबेळगोळ : भगवान बाहुबली महामस्ताकाभिषेक सोहळा, ४०० त्यागींचे आगमन

googlenewsNext

कोल्हापूर - जगभरातील जैन बांधवांचे श्रद्धास्थान असणाºया श्रवणबेळगोळ ( कर्नाटक) येथील भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक महोत्सवासाठी आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक त्यागींचे आगमनही झाले आहे. त्यांच्या आहारासाठी (चौका) कोल्हापूर व सांगली परिसरातील श्रावक-श्राविका श्रवणबेळगोळला रवाना झाले आहेत.
गुरुवारी आचार्य विशुद्धसागर महाराज आणि त्यांच्या संघाचे श्रवणबेळगोळ येथे आगमन झाले आहे. भट्टारक पट्टाचार्य चारुकीर्ती महाराज, श्रीपाल गंगवाल
यांच्यासह महोत्सव समितीने त्यांचे स्वागत केले.
भट्टारक पट्टाचार्य चारुकीर्ती महाराजांच्या मार्गदर्शनाखाली व अधिपत्याखाली श्रवणबेळगोळ येथे महामस्तकाभिषेक व पंचकल्याण महोत्सव होत आहे. यासाठी देशभरातील मुनी, माताजी येणार आहेत. आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक त्यागींचे आगमनही झाले आहे. त्यागींच्या आहाराची व्यवस्था चौकानगर येथे केली आहे.
आहार देण्यासाठी कोल्हापूर, सांगली, जयसिंगपूर, कुरुंदवाड, बेळगाव, कल्लोळ या परिरातील अनेकजण दोन महिन्यांपासूनच तेथे दाखल झाले आहेत. आहार देणाºया प्रत्येक गटात साधारण ५ ते ७ श्रावक-श्राविका आहेत. त्यांच्यासाठी राहण्याची स्वतंत्र सोय आहे. आहारासाठी प्रत्येक गटाला २० बाय १२ च्या दोन खोल्या दिल्या आहेत. सर्व साहित्य समिती पुरवते. यामध्ये दररोज ताजे तूप, ५ ते ७ लिटर दूध, उसाचा रस, एक डझन केळी, सफरचंद, दोन अननस, डाळिंबे, तांदूळ, भाजी, लोण, पीठ दिले जाते. धान्य दळण्यासाठी या परिसरातच दोन चक्क्या उभारल्या असून आहाराचे साहित्य प्रत्येकापर्यंत पोहोच करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे.

१०० ठिकाणी त्यागींना आहाराची व्यवस्था

चौकानगरमध्ये देशभरातून येणाºया त्यागींना आहार देण्यासाठी सांगली, कोल्हापूर, बेळगाव परिसरातून मोठ्या प्रमाणात श्रावक-श्राविका गेल्या दोन महिन्यांपासूनच गेल्या आहेत. साधारण १०० ठिकाणी ते त्यागींना आहार देण्याचे काम करत आहेत. येत्या रविवारी बोरगाव (ता. चिक्कोडी) येथून साधारण १०० स्वयंसेवक रवाना होणार असल्याचे महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील यांनी सांगितले.

Web Title: Shravanabelalgola: Lord Bahubali Mahamastakabhishek Souza, 400 Advent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.