जोतिबा डोंगरावर श्रावणषष्ठी

By Admin | Published: August 9, 2016 12:20 AM2016-08-09T00:20:50+5:302016-08-09T00:22:49+5:30

पूरस्थितीतही गर्दी : दर्शनमार्गावर प्रशासनामार्फत कडेकोट बंदोबस्त

Shravavashthi on Jyotiba Mountain | जोतिबा डोंगरावर श्रावणषष्ठी

जोतिबा डोंगरावर श्रावणषष्ठी

googlenewsNext

जोतिबा : जोतिबाच्या नावानं चांगभलंऽऽ, श्री चोपडाईदेवीच्या नावानं चांगभलंऽऽ च्या गजरात येथील श्रावणषष्ठी यात्रा भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. दाट धुके, पावसाची रिपरिप, पूर परिस्थितीतसुद्धा भाविकांची जोतिबा डोंगरावरील उपस्थिती लक्षणीय होती. यात्रेस दीड लाख भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. जोतिबा ग्रामपंचायतमार्फत भाविकांना पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या सुविधा पुरविल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ट्रिकल नावाचे श्वान मंदिर परिसरात फिरविले. प्रशासनामार्फत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंगळवारी सकाळी सहा वाजता यात्रेची धुपारती सोहळ्याने सांगता होणार असल्याने भाविकांच्या झुंडी रात्रभर येतच होत्या.
सोमवारी सायंकाळी सहानंतर श्री आदिमाय चोपडाईदेवीची (चर्पटआंबा) षोड्शोपचार महापूजा बांधण्यात आली. त्यानंतर देवीस लिंबू, बेलपत्र, सौंदड, फुलमाला यांचा मुकुट अर्पण करण्यात आला. शंखघोष झाला. देवीची पूजा वैशिष्टपूर्ण असून, ती वर्षातून एकदाच बांधण्यात येते. रात्रभर देवीचा जागर सोहळा सुरू होता. यासाठी भाविकांना दर्शनासाठी रात्रभर मंदिर खुले ठेवण्यात आले. त्यामुळे रात्रभर रांगा लागल्या होत्या. दर्शन रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस विभागाच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, देवस्थान समितीचे कर्मचारी, सेवाभावी संस्था आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना यात्राकाळातील मूलभूत सुुविधा पुरविण्यासाठी सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग गेली दोन दिवस जोतिबा डोंगरावर तळ ठोकून आहे.
सध्या सुरूअसणाऱ्या पूर परिस्थितीमुळे कोल्हापूर ते जोतिबा हा प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे जोतिबा डोंगरावर श्रावणषष्ठीसाठी करण्यात आलेल्या वाहतूक नियोजनामुळे विभागाच्या पोलिस कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागली. भाविकांनासुद्धा आर्थिक भुर्दंड सहन करून लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागला.
एस.टी. महामंडळाच्यावतीने जोतिबाकडे येण्यासाठी शिरोली, टोप, कासारवाडी, सादळे-मादळे आणि गिरोलीमार्गे जोतिबा, तर जोतिबा डोंगरावरून जाण्यासाठी दानेवाडी, वाघबीळ, बोरपाडळे, कोडोली, वारणानगर, पारगाव आणि वाठार असा मार्ग नियोजित करण्यात आला होता. यामुळे गिरोली येथील रस्त्यावर वाहतुकीचा मोठा ताण पडला होता. (वार्ताहर)


मंदिर रात्रभर खुले
भाविकांना दर्शनासाठी रात्रभर मंदिर खुले ठेवण्यात आले. त्यामुळे रात्रभर रांगा लागल्या होत्या. दर्शन रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस विभागाच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, देवस्थान समितीचे कर्मचारी, सेवाभावी संस्था आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाहतूक नियोजनामुळे विभागाच्या पोलिस कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी
लागली.

Web Title: Shravavashthi on Jyotiba Mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.