पारंपारिक वाद्यांचा गजरात राजाराम तलावात ‘श्री’ विर्सजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 02:54 PM2017-09-06T14:54:22+5:302017-09-06T15:01:09+5:30

पारंपारिक वाद्याच्या गजरात कोल्हापूरातील राजाराम तलाव येथे मंगळवारी श्री गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. या ठिकाणी मुर्तीदान उपक्रमास उत्सफुर्ती प्रतिसाद देत ६५ लहान - मोठ्या गणेश मुर्तीचे दान करण्यात आले.

The 'Shree' Varsjan in the Rajaram lake in the euphoria of traditional instruments | पारंपारिक वाद्यांचा गजरात राजाराम तलावात ‘श्री’ विर्सजन

विसर्जनासाठी नागिरकांची मोठी गर्दी

Next
ठळक मुद्देपाण्यात बुडणाºया युवकास जीवदानमुर्तीदानास उत्सफर्ते प्रतिसाद

कोल्हापूर : पारंपारिक वाद्याच्या गजरात राजाराम तलाव येथे मंगळवारी श्री गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. या ठिकाणी मुर्तीदान उपक्रमास उत्सफुर्ती प्रतिसाद देत ६५ लहान - मोठ्या गणेश मुर्तीचे दान करण्यात आले. या ठिकाणी पाण्यात बुडणाºयां एका युवकाला अग्निशामक दलांच्या जवानांनी वाचविले. रात्री साडेनऊच्या सुमारास या ठिकाणी शेवटच्या गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यात आले.


राजाराम तलाव येथे उजळाईवाडी, सरनोबतवाडी, मोरेवाडी, आर. के. नगर, दौलत नगर, सम्राटनगर, राजारामपुरी, टेबालाईवाडी, विक्रमनगर, उचंगाव परिसरातील मंडळाचे गणेश मुर्ती व घरगुती गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून विसर्जन करण्यासाठी नागरिक येवू या ठिकाणी येवू लागले. दुपारी एकनंतर मोठ्या मंडळाचे गणेशमुर्ती सोडण्यास मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी सांयकाळी आठ पर्यंत सुरुच होती.


राजाराम तलावाच्या गेटजवळच मनपा प्रशासनाच्यावतीने मुर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात येते होते. या ठिकाणी मुर्ती ठेवण्यासाठी प्रशस्त मंडप उभा करण्यात आले होते. दिवसभरात लहान - मोठ्या ६४ गणेश मुर्तीचे दान करण्यात आले. यासह उजळाईवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने मुर्ती दान उपक्रमास प्रतिसाद दिला. रात्री साडेनऊच्या सुमार उचंगाव येथील एका मंडळाच्या शेवटच्या गणेश मुर्तीचे या ठिकाणी विसर्जन करण्यात आले.


याठिकाणी पोलिस प्रशासानाच्यावतीने मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व अग्निशामक दलांचे जवान सकाळी सात वाजल्या पासून या ठिकाणी तैनात होते. तसेच १०८ रुग्णवाहिका या ठिकाणी तैनात होते. या ठिकाणी होणार्या गणेश विसर्जन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


‘गणेश’ यांचामुळे पुन्हा एकादा ‘जीवदान’


राजाराम तलाव येथे मंगळवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास मुडशिंगी येथील गणेश मंडळाचा कार्यकर्ता सम्राट नगरकर (२५, रा. मुडशिंगी, ता. करवीर) हा गणेश मुर्ती सोडण्यासाठी पाण्यात उतरला असता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटकाळ््या खाऊ लागला, यावेळी पाण्याबाहेरील कार्यकर्ते व भाविकांनी त्याला वाचविण्यासाठी आरडाओरड करू लागले.

या ठिकाणी तैनात असलेल्या अग्निशामक दलाचे फायरमन गणेश लकडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उडी मारून त्याला बाहेर काढले. त्यांना अग्निशामक दलाचे नीतेश शिनगारे, दौलत रावराणे यांनी मदत केली. गणेश यांनी याच ठिकाणी दोन वर्षे पूर्वी गणेश विसर्जन वेळा दोघा युवकांना पाण्यात बुडताना जीवदान दिले होते. त्यामुळे गणेश यांच्यामुळे पुन्हा एकदा जीवनदान मिळाल्यांची चर्चा या ठिकाणी सुरु होती.

उर्त्स्फूतपणे निर्माल्य दान


मनपा प्रशासनाच्यावतीने मुर्तीदान करण्याचे अहवान करण्यात येते होते. मात्र मनपा प्रशासनाच्यावतीने निर्माल्य दान करण्यासाठी कोणतीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली नव्हती. तरीही तलावाच्या एका बाजूला मंडळाच्या कार्यकर्ते व नागरीक स्वत:हून एका ठिकाणी निर्माल्य दान करीत होते.

पारंपारिक वाद्यांचा गजर..


राजाराम तलाव येथेही दरवर्षी डॉल्बीच्या दणदणाटात मंडळाच्या गणेश मुर्तीचे विर्सजन केले जाते. मात्र यंदा प्रशासनाने डॉल्बी न लावण्याचा आवाहन येथील मंडळानी चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. पारंपारिक वाद्यांचा गजरात या ठिकाणी अनेक मंडळानी गणेश मुर्तीचे विसर्जन केले.

१२५ मुर्ती दान तर १६८ मुर्तीचे विसर्जन


राजाराम तलाव व कोटीतीर्थ या दोन्ही ठिकाणी एकूण १२५ गणेश मुर्तीचे दान करण्यात आले तर १६८ गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. गतवर्षी पेक्षा यंदा मोठ्या मंडळाकडून चांगला प्रतिसाद मिळल्याची प्रतिक्रिया मनपाच्या अधिकारी यांनी यावेळी व्यक्त केली.

 

Web Title: The 'Shree' Varsjan in the Rajaram lake in the euphoria of traditional instruments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.