जोतिबा मंदिरात आज वैकुंठ चतुर्दशी निमित्त श्री जोतिबा देवाची श्री विष्णू रुपात महापूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:56 PM2018-11-22T12:56:19+5:302018-11-22T12:59:52+5:30
जोतिबा मंदिरात आज सकाळी..वैकुंठ चतुर्दशी निमित्त श्री . जोतिबा देवाची श्री विष्णू रुपात महापूजा बांधली . सकाळी वैकुंठ चतुर्दशी निमित्त बांधण्यात आलेल्या श्री .विष्णू रुपी पूजेचे आध्यात्मिक महत्त्व असे की श्री .विष्णु नी सुदर्शन चक्र मिळविण्यासाठी
जोतिबा -ऑनलाईन लोकमत --जोतिबा मंदिरात आज सकाळी..वैकुंठ चतुर्दशी निमित्त श्री . जोतिबा देवाची श्री विष्णू रुपात महापूजा बांधली . सकाळी वैकुंठ चतुर्दशी निमित्त बांधण्यात आलेल्या श्री .विष्णू रुपी पूजेचे आध्यात्मिक महत्त्व असे की श्री .विष्णु नी सुदर्शन चक्र मिळविण्यासाठी श्री . शिव शंकराची एक हजार एक कमोद कमळ वाहून पूजा करण्येचा संकल्प केला .
कमोद कमळ स्वर्गातून आणण्यास श्री . नारद मुनीला सांगितले . त्याप्रमाणे नारद मुनी नी एक हजार एक कमळ आणली . श्री .विष्णूनी शिवपूजेस सुरुवात केली . त्याच वेळी शिवभक्त शुक्राचार्य यांनी शंकराना विष्णूची परीक्षा घेण्यास सांगितले . त्याप्रमाणे शंकरानी नारदानी आणलेल्या एक हजार एक कमळा पैकी एक कमळ गुप्तपणे गायब केले .विष्णूनी चालू केलेल्या संकल्प पूजेमध्ये एक कमळ कमी पडले . तेव्हा विष्णूनी नारदाला एक कमळ घेऊन यायला सांगितले .
नारद स्वर्गात गेले तेव्हा स्वर्गातील सर्व कमळे गुप्त झाली होती . नारदानी ही सर्व हकीकत सांगितल्यावर श्री .विष्णूनी आपला डोळा दाखवून या डोळ्यास काय म्हणतात असा प्रश्न नारदाला केला तेव्हा नारद म्हणाले याला नेत्र कमळ म्हणतात . त्याच क्षणी विष्णूनी नी आपला डोळा काढला आणि शिवपूजेस नेत्र कमळ वाहून पूजा पूर्ण केली . श्री . शिवशंकर प्रकट झाले आणि महा सुदर्शन चक्र श्रीविष्णूला दिले . आशी अख्यायिका सांगितली जाते . त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त श्री . जोतिबा मंदिरात दीप प्रज्वलीत करून शिखरे पाजाळण्याचा उत्सव साजरा होईल. रात्री ८ वाजता श्री जोतिबा देवाचा मंदिर प्रदक्षिणेसाठी पालखी सोहळा निघणार आहे .. गुलाल खोबऱ्यांची उधळण करून भाविकांनी चांगभलं चा गजर करेल.या त्रिपुरारी पौर्णिमेपासून सलग पाच पौर्णिमा करण्यास प्रारंभ करतात .