श्री राम चॅरिटेबल रुग्णालय सर्वसामान्यांसाठी आधारवड ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:23 AM2021-03-17T04:23:23+5:302021-03-17T04:23:23+5:30

कोपार्डे : कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा आर्थिक दृष्टीने परवडणारी नाही. मात्र, श्री राम चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने ...

Shri Ram Charitable Hospital will be a support for the common man | श्री राम चॅरिटेबल रुग्णालय सर्वसामान्यांसाठी आधारवड ठरेल

श्री राम चॅरिटेबल रुग्णालय सर्वसामान्यांसाठी आधारवड ठरेल

Next

कोपार्डे : कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा आर्थिक दृष्टीने परवडणारी नाही. मात्र, श्री राम चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शिंगणापूर येथे उभारलेले धर्मार्थ रुग्णालय सर्वसामान्यांसाठी आधारवड ठरेल, असा विश्वास जिल्हा परिषद माजी आरोग्य व बांधकाम सभापती डी. आर. पाटील यांनी व्यक्त केला. शिंगणापूर (ता. करवीर) येथील श्री राम चॅरिटेबल ट्रस्ट धर्मार्थ रुग्णालयाचे उद्घाटन डी. आर. पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजप माजी जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील होते. यावेळी डॉ. इंद्रजित पाटील व डॉ. वर्षा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी उपसरपंच महेश पाटील, ‘कुंभी’चे संचालक प्रकाश पाटील, हिंदुराव पाटील, शिवाजी बाबुवा, बाळासाहेब बोराटे, बळिराम देसाई, संग्राम पाटील, सुभाष पालकर, ॲड. रूपाली पाटील, सीताराम पाटील उपस्थित होते.

फोटो : १६ शिंगणापूर रुग्णालय

शिंगणापूर येथील श्री राम चॅरिटेबल ट्रस्ट धर्मार्थ रुग्णालयाचे उद्घाटन बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती डी. आर. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. इंद्रजित पाटील, डॉ. वर्षा पाटील, महेश पाटील, संग्राम पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील व बळिराम पाटील उपस्थित होते.

Web Title: Shri Ram Charitable Hospital will be a support for the common man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.