‘चिल्लर पार्टी’तर्फे जंगलात पाण्यासाठी श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2017 12:30 AM2017-05-10T00:30:54+5:302017-05-10T00:30:54+5:30

पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचे पुनरुज्जीवन

Shrimadan for drinking water by 'Chillar Party' | ‘चिल्लर पार्टी’तर्फे जंगलात पाण्यासाठी श्रमदान

‘चिल्लर पार्टी’तर्फे जंगलात पाण्यासाठी श्रमदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत स्वच्छ करून ते खुले करण्यासाठी चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीच्या सदस्यांनी तीन दिवस शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथील जंगलात श्रमदान केले. या मोहिमेचे उद्घाटन प्रा. एस. आर. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमोद माळी यांनी सर्वांचे स्वागत केले.
माणूस आणि निसर्ग, प्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत स्वच्छ
करून ते खुले करण्याचे काम आंबा येथील वसुरक्षक सोशल फोर्स करत आहे. गेली तीन वर्षे या संस्थेने हा उपक्रम
सुरू ठेवला आहे. आंबा येथे सुरू असलेल्या या
उपक्रमात कोल्हापुरातील चिल्लर पार्टी विद्यार्थी
चळवळीच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग घेत तीन दिवसीय श्रमदान केले.
निसर्गातील हस्तक्षेपामुळे माणूस अनेक संकटे स्वत:वर ओढावून घेत आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेला उष्मा हा या हस्तक्षेपाचाच एक भाग आहे. उष्म्यामुळे सगळीकडचा पाण्याचा साठा कमी होत चालला आहे. यातच माती, पालापाचोळा आणि मानवी हस्तक्षेप यामुळे जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत मुजले जात आहेत. त्यामुळे पाण्यासाठी जंगलातील प्राणी मानवी वस्तीत शिरत आहेत. शिवारात त्यांना चारा आणि पाणी दोन्ही मिळते,
त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होते आणि निसर्ग आणि माणसातील संघर्ष सुरू होतो, असे मत प्रा. पाटील यांनी व्यक्त केले.
या शिबिरात जलस्रोत खुले करण्याबरोबरच प्राण्यांसाठी चिखलाची लोळण तयार करण्याचेही काम केले. चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीचे मिलिंद यादव, देविका बकरे, नसीम यादव, शिवप्रभा लाड, आरती कोपार्डेकर, जयसिंग चव्हाण यांनी भाग घेतला.

Web Title: Shrimadan for drinking water by 'Chillar Party'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.