श्रीपतरावदादा बँकेला १.४३ कोटीचा नफा - पी. एन. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:27 AM2021-03-01T04:27:19+5:302021-03-01T04:27:19+5:30
काेल्हापूर : श्रीपतरावदादा सहकारी बँकेला १ कोटी ४३ लाख रुपये नफा झाला असून शेतकऱ्यांसह व्यावसायिकांना आधार देण्याचे काम केल्याचे ...
काेल्हापूर : श्रीपतरावदादा सहकारी बँकेला १ कोटी ४३ लाख रुपये नफा झाला असून शेतकऱ्यांसह व्यावसायिकांना आधार देण्याचे काम केल्याचे प्रतिपादन बँकेचे संस्थापक, आमदार पी. एन. पाटील यांनी केले.
फुलेवाडी येथे श्रीपतरावदादा सहकारी बॅंक, राजीवजी सहकारी सूतगिरणी व निवृत्ती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, श्रीपतरावदादा बँकेने सहा शाखांतून अत्याधुनिक सुविधांसह सेवा दिली असून वार्षिक उलाढाल ३७०० कोटी रुपयांची झाली. राज्यातील सहकारी सूतगिरण्या अडचणीतून वाटचाल करत आहेत. त्यामुळे शासनाने प्रतिचाती पाच हजार रुपये मदत करावी. त्यापैकी निम्मे अनुदान व निम्मी रक्कम बिनव्याजी द्यावी, तसेच कापूस खरेदीवर दहा टक्के अनुदान देऊन सूतगिरण्यांना कायमस्वरूपी प्रति युनिट तीन रुपये दराने वीजपुरवठा करावा, अशी मागणीही यावेळी केली.
बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. दिंडे यांनी अहवाल वाचन केले. राजीवजी सूतगिरणीचे अध्यक्ष राहुल पाटील, निवृत्ती संघाचे अध्यक्ष ए. डी. माने, ‘गोकुळ’चे बाळासाहेब खाडे, बी. एच. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
बाबासाहेब पाटील-भुयेकर, ‘गोकुळ’चे संचालक उदय पाटील, सत्यजित पाटील, बँकेचे उपाध्यक्ष गणपतराव पाटील, सूतगिरणीचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, मारुतराव जाधव, बळवंत पाटील, मारुती पाटील, दीपक घाेलपे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी :
फुलेवाडी येथे श्रीपतरावदादा बँक, राजीवजी सूतगिरणी व निवृत्ती संघाच्या सर्वसाधारण सभेत आमदार पी. एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले. (फोटो-२८०२२०२१-कोल-श्रीपतरावदादा बँक)