‘केआयटी एमयूएन’मध्ये श्रुती मोरे, अनिर मिश्रा, राघव समाणी, विराज माने विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:21 AM2021-03-24T04:21:25+5:302021-03-24T04:21:25+5:30

या स्पर्धेचे उदघाटन युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका वेस्ट विन्डसरचे महापौर हेमंत मराठे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेतील वादविवाद सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी ...

Shruti More, Anir Mishra, Raghav Samani, Viraj Mane win in KIT MUN | ‘केआयटी एमयूएन’मध्ये श्रुती मोरे, अनिर मिश्रा, राघव समाणी, विराज माने विजयी

‘केआयटी एमयूएन’मध्ये श्रुती मोरे, अनिर मिश्रा, राघव समाणी, विराज माने विजयी

googlenewsNext

या स्पर्धेचे उदघाटन युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका वेस्ट विन्डसरचे महापौर हेमंत मराठे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेतील वादविवाद सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी विविध देश, मंत्रिमंडळ यांचे मुद्दे मांडले. प्रथम, वादविवाद सत्रानंतर संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, रजिस्ट्रार डॉ. एम. एम. मुजूमदार, अक्षय थोरवत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई आदी शहरांतील ११०हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. स्पर्धेमध्ये विधानसभा, यूएनइपी, यूएनएचआरसी व आयपी या समितीचे (कमिटी) आयोजन केले होते. श्रेयस मोहिते, ऐश्वर्या महाळे, कोमल मेखला, प्रज्वल चौगुले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. केआयटी एमयूएनचे अध्यक्ष शिवम हासूरकर, डिरेक्टर जनरल रणवीर पाटील, सचिव शंभुराज पाटील, प्रा. अमर टिकोळे, प्रमोद पाटील यांनी स्पर्धेचे संयोजन केले. त्यासाठी केआयटीचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव दीपक चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो (२३०३२०२१-कोल-केआयटी कॉलेज) : कोल्हापुरातील केआयटी कॉलेजमधील केआयटी एमयूएन २०२१ या स्पर्धेतील विधानसभा समितीमधील विजेत्यांसमवेत परीक्षक श्रेयस मोहिते उपस्थित होते.

Web Title: Shruti More, Anir Mishra, Raghav Samani, Viraj Mane win in KIT MUN

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.