इतिहासाच्या विषारीकरणातून शंभूराजांची बदनामी: आनंद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:38 AM2018-10-15T00:38:52+5:302018-10-15T00:39:01+5:30

कोल्हापूर : इतिहासाचे विषारीकरण झाले असून ते ओळखणारा येथे कोणीच नाही; त्यामुळेच छत्रपती शंभूराजे यांच्या बदनामीसारखे प्रकार वारंवार घडत ...

Shubhagraj's infamy from the history of poisoning: Anand Patil | इतिहासाच्या विषारीकरणातून शंभूराजांची बदनामी: आनंद पाटील

इतिहासाच्या विषारीकरणातून शंभूराजांची बदनामी: आनंद पाटील

Next

कोल्हापूर : इतिहासाचे विषारीकरण झाले असून ते ओळखणारा येथे कोणीच नाही; त्यामुळेच छत्रपती शंभूराजे यांच्या बदनामीसारखे प्रकार वारंवार घडत आहेत. यासाठी हे विषारीकरण ओळखले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद पाटील यांनी रविवारी येथे केले.
शाहू स्मारक भवनात मराठा महासंघातर्फे आयोजित शंभूराजे सन्मान परिषदेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. परिषदेमध्ये शंभूराजेंची प्रतिमा मलिन करणाऱ्या लेखिका डॉ. शुभा साठे यांच्यासह सरकारबद्दल मान्यवरांनी यावेळी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी इंद्रजित माने यांनी मांडलेल्या ठरावांना हात उंचावून मंजुरी देण्यात आली.
आनंद पाटील म्हणाले, आपला इतिहास जवळच आहे; परंतु तो आपल्याला दिसत नाही. आपण याबाबत अभ्यास करीत नाही. कुठला तरी जुना कागद शोधायचा आणि त्याचे भाषांतर करायचे या पलीकडे आपण जात नाही. येथील इतिहासाचे पुरावे नष्ट करण्यात आले असून, खºया इतिहासाचे संशोधन हे परदेशातच होत आहे.
डॉ. मोरे म्हणाले, छत्रपती शिवाजी व शंभूराजे यांची बदनामी ही राज्याभिषेक दिन सोहळ्यापासून आजपर्यंत सुरूच आहे. ती पुस्तकापुरती मर्यादित नसून ‘राजसंन्यास,’ ‘बेबंदशाही’ अशा नाटकांमधूनही सुरू आहे. त्यामुळे या नाटकांवरही बंदी घातली पाहिजे.
इंद्रजित सावंत म्हणाले, जोपर्यंत हे सरकार बदलत नाही, तोपर्यंत बदनामीचे षड्यंत्र सुरूच राहणार आहे; त्यामुळे नुसती ही परिषद घेऊन न थांबता या पुस्तकांची सरकार जाहीर होळी करीत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबविणार नाही. विलास पोवार म्हणाले, इतिहासाचे पुनर्संशोधन होऊनही बदनामी सुरूच आहे.
पी. बी. पोवार म्हणाले, आपल्यातील उणिवांमुळे व दुर्लक्षामुळे असे प्रकार होत आहेत. पठाण म्हणाले, कोणतेही पुरावे नसताना शंभूराजेंच्या बदनामीचा मजकूर छापण्याचा प्रकार निषेधार्ह आहे. वसंतराव मुळीक यांनी शंभूराजेंची बदनामी सहन केली जाणार नाही, असा इशारा देत संबंधितांना त्याच भाषेत उत्तर देऊ, असे सांगितले.
परिषदेतील ठराव असे
‘समर्थ रामदास स्वामी’ या पुस्तकातून छत्रपती शंभूराजे यांची बदनामी करणाºया लेखिका डॉ. शुभा साठे यांच्यासह प्रकाशक, सर्व शिक्षा अभियानांतर्गत या पुस्तकास मंजुरी देणाºया समिती सदस्यांसह अधिकाºयांवर गुन्हा दाखल करावा.
या संदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर माफी मागून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.
शासनाने छत्रपती शंभूराजेंचे अधिकृत चरित्र प्रकाशित करावे.
छत्रपती शंभूराजे यांना ‘राष्टÑपुरुष’ म्हणून मान्यता द्यावी.
शंभूराजेंचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावर त्यांचे भव्य स्मारक उभारावे.
संत तुकाराम यांच्या पत्नीबद्दल चुकीचे लेखन केलेल्या पुस्तकावर बंदी घालावी.
संत तुकाराम व संत रामदास यांची चुकीच्या पद्धतीने तुलना करणाºया ‘महाराष्टÑाचे सारस्वत’ या पुस्तकावर बंदी घालावी.

Web Title: Shubhagraj's infamy from the history of poisoning: Anand Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.