वडगावात शुकशुकाट, अत्यावश्यक सेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:23 AM2021-04-11T04:23:50+5:302021-04-11T04:23:50+5:30

शहरातील नेहमी गजबजलेल्या पालिका चौक, बसस्थानक परिसर, लाटवडे रोड, बिरदेव चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छ. शिवाजी महाराज चौक, ...

Shukshukat in Wadgaon, essential services started | वडगावात शुकशुकाट, अत्यावश्यक सेवा सुरू

वडगावात शुकशुकाट, अत्यावश्यक सेवा सुरू

Next

शहरातील नेहमी गजबजलेल्या पालिका चौक, बसस्थानक परिसर, लाटवडे रोड, बिरदेव चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छ. शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर रोडवर शुकशुकाट होता. पद्मारोड, वाणी पेठ, धान्य लाईन, गूळ लाईन परिसरात मुख्य बाजारपेठेतही शुकशुकाट होता. आज सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घराबाहेर न येता वीकेंड लॉकडाऊनला पाठिंबा दिला. त्याबरोबर अत्यावश्यक सेवा वगळता कोणताही वाहनधारक रस्त्यावर आला नाही. त्यामुळे सर्वत्र शांतता होती. अत्यावश्यक सेवा सुरू होत्या.

वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्यासह ३५ पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तात सहभागी झाले आहेत. तसेच शहरात प्रवेश करणा-या नाक्यावर बॅरिकेडस् लावून वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारक, हातकणंगले रोड, भोदोले रोड, वाठार नाका, आदी ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. वीकेंड लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका यांनाच प्रवासाला परवानगी दिली जात आहे.

१० वडगाव लॉकडाऊन

फोटो -पेठवडगाव वीकेंड लॉकडाऊनमुळे नगरपालिका चौकात शुकशुकाट छाया.संतोष माळवदे,वडगाव

00000

Web Title: Shukshukat in Wadgaon, essential services started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.