इचलकरंजीत सकाळी अकरा वाजताच शटर डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:25 AM2021-04-21T04:25:08+5:302021-04-21T04:25:08+5:30
राज्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. शहरातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. काही नियम व अटींचे पालन ...
राज्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. शहरातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. काही नियम व अटींचे पालन करून केवळ अत्यावश्यक आस्थापनाच सकाळी सात ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्य शासन निर्णयामध्ये बदल करून आस्थापनाची वेळ कमी करण्याच्या तयारीत आहे. मात्र, सोशल मीडियावर मंगळवार दि. २० एप्रिलपासून ते ३० एप्रिलपर्यंत आस्थापना सकाळी सात ते अकरा या वेळेतच सुरू राहतील. याबाबतची माहिती दिवसभर व्हायरल झाली होती. या भावनेतून व प्रशासनाच्या कारवाईची धास्ती घेत, व्यापाऱ्यांनी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत आस्थापने सुरू ठेवली. बॅँका, शासकीय कार्यालये, औषध दुकाने, रिक्षा वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.