रूग्णवाढ सुरूच, मृत्यूही थांबेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:12+5:302021-05-29T04:20:12+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच असून मृत्यूही थांबेनात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नवे २१३१ कोरोना रुग्ण ...

Sickness continues, death does not stop | रूग्णवाढ सुरूच, मृत्यूही थांबेनात

रूग्णवाढ सुरूच, मृत्यूही थांबेनात

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच असून मृत्यूही थांबेनात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नवे २१३१ कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले असून ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. १ हजार ७८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी म्हणून सध्या जिल्ह्यात अधिकाधिक चाचण्या करण्यात येत असून त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढत आहे. कोल्हापूर शहरामध्ये सर्वाधिक ६३९ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले असून करवीर तालुक्यात ३९९ रुग्ण आढळले आहेत. हातकणंगले तालुक्यात १९३ नागरिकांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

कोल्हापूर शहर आणि हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी १० रूग्णांचा मृत्यू झाला असून करवीर तालुक्यातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर शहरापाठोपाठ हातकणंगले आणि करवीर तालुक्यातील रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या चिंतेचा विषय बनला आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांचीही संख्या वाढत असून शुक्रवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासांत १७८६ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

चौकट

कोल्हापूर, हातकणंगलेत प्रत्येकी १० मृत्यू

कोल्हापूर १०

साने गुरूजी वसाहत, बापट कॅम्प, कसबा बावडा, राजारामपुरी, कदमवाडी, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ २, होळकरनगर, सम्राटनगर

हातकणंगले १०

अंबप, नवे चावरे, पेठवडगाव, चंदूर २, कोरोची, रूकडी, कबनूर, तिळवणी, रेंदाळ

करवीर ०९

उचगाव, शिये, घानवडे, नंदगाव, मोरेवाडी, खुपिरे, वडणगे २, म्हाळुंगे

गडहिंग्लज ०४

गडहिंग्लज ०२, तळेवाडी, हसूरचंपू

कागल ०४

सुळकुड, लिंगनूर, करड्याळ, बेलेवाडी

शाहूवाडी ०३

चरण, माणगाव, विरळे

भुदरगड ०३

करडवाडी, गारगोटी ०२

शिरोळ ०२

दत्तवाढ, शिरढोण

पन्हाळा ०२

कोडोली, जाखले

चंदगड ०१

हलकर्णी

राधानगरी ०१

राशिवड

इतर जिल्हे ०३

शेडबाळ, शामनेवाडी, नागळी

Web Title: Sickness continues, death does not stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.