सिद्धीका ओतारी पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 11:53 PM2017-10-05T23:53:10+5:302017-10-05T23:55:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : येथील सिद्धीका महेश ओतारी हिने बारावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागामध्ये विमुक्त जाती भटक्या-जमाती प्रवर्गात प्रथम क्रमांक पटकाविला
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : येथील सिद्धीका महेश ओतारी हिने बारावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागामध्ये विमुक्त जाती भटक्या-जमाती प्रवर्गात प्रथम क्रमांक पटकाविला. याबद्दल तिला बुधवारी मुंबईत जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विवेकानंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या सिद्धीका ओतारी हिने बारावीच्या परीक्षेत वाणिज्य शाखेत ९१.२३ टक्के गुण मिळविले. या गुणांसह तिने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागामध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गात प्रथम क्रमांक पटकविला. याबद्दल तिला सन २०१६-१७ चा वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार जाहीर झाला. तिला हा पुरस्कार विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागातर्फे बुधवारी आयोजित केलेल्या मुंबईतील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि ५१ हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप होते. या कार्यक्रमास राज्यमंत्री मदन येरावार उपस्थित होते.
सिद्धीका ओतारी (पुरस्कार) : बारावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागामध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गात प्रथम क्रमांक पटकविणाºया सिद्धीका ओतारी हिला बुधवारी जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शेजारी आई कविता, वडील महेश ओतारी उपस्थित होते.