पीएमसी बँक अधिकाऱ्यांना घेराव, अधिकारी धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 04:51 PM2019-10-11T16:51:08+5:302019-10-11T16:54:27+5:30
एक लाखापर्यंतच्या ठेवींना विमा सुरक्षा असते; त्यामुळे विम्याच्या रकमेतून ठेवीदारांना एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी तातडीने देण्यात याव्यात, या मागणीसाठी पी. एम.सी बँक खातेदार हक्क संरक्षण समितीतर्फे रुईकर कॉलनी येथील शाखेतील बँक अधिकाऱ्यांना घेराव घातला. दिवाळी असल्याने ग्राहकांनी रक्कम देण्याबाबत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
कोल्हापूर : एक लाखापर्यंतच्या ठेवींना विमा सुरक्षा असते; त्यामुळे विम्याच्या रकमेतून ठेवीदारांना एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी तातडीने देण्यात याव्यात, या मागणीसाठी पी. एम.सी बँक खातेदार हक्क संरक्षण समितीतर्फे रुईकर कॉलनी येथील शाखेतील बँक अधिकाऱ्यांना घेराव घातला. दिवाळी असल्याने ग्राहकांनी रक्कम देण्याबाबत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
रिझर्व्ह बँकने पंजाब महाराष्ट्र को-आॅपरोटिव्ह बँकेवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे ग्राहकांना खात्यावरून पैसे काढण्यासाठी मर्यादा आहेत. दिवाळी सण असल्याने खात्यावर पैसे असूनही मिळेना अशी स्थिती आहे. या विरोधात ग्राहकांचा संयम सुटत आहे.
पी.एम.सी. बँक खातेदार हक़क संरक्षण समितीच्यावतीने शुक्रवारी रूईकर कॉलनी येथील शाखेमध्ये जाऊ न बँकेचे व्यवस्थापक सुदीप सावंत, सिनीयर मॅनेजर मीना किंकर, सिनीयर मॅनेजर रोहीत पाटील यांना घेराव घातला.
यावेळी समितीचे चंद्रकांत जाधव, राजू लाटकर, रमेश आपटे, मीरा ताठे, शाम आवळे, डॉ. उदय लोखंडे यांच्यासह ग्राहक मोठया संख्यने उपस्थित होते.