आजरा-आंबोली मार्गावर अजगराचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 07:11 PM2022-10-18T19:11:23+5:302022-10-18T19:30:35+5:30
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले
सदाशिव मोरे
आजरा : आजरा-आंबोली मार्गावर टस्कर नंतर पर्यटकांना अजगराचे दर्शन झाले. अचानकच मार्गावर लांबलचक अजगर दिसतात रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने थांबली. यानंतर अगदी हळूवारपणे रस्ता ओंलाडून अजगर शेतात गेला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आजरा-आंबोली रस्त्यावर माद्याळ तिट्टा ते मसोबा देवस्थान दरम्यान पर्यटकांना अजगराने रात्री दर्शन झाले. देवकांडगाव (ता. आजरा) येथील उमेश चव्हाण व समीर चव्हाण यांनी अजगर रस्त्यावर आल्याचे पाहून सर्व पर्यटकांची वाहने थांबून ठेवली. दोन्ही बाजूला जवळपास दहा ते पंधरा मिनिटे गाड्या थांबून होत्या. हा अजगर जवळपास १२ ते १४ फूट लांबीचा असल्याचे सांगण्यात आले. अजगर शांतपणे रस्ता ओलांडून शेतात घुसला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले.