सिग्नल सुरु, फक्त दोन तासापुरते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:29 AM2021-06-09T04:29:04+5:302021-06-09T04:29:04+5:30

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन परिस्थितीत रस्त्यावरील वाहतुकीला निर्बंध घातल्याने रस्ते रिकामे राहिले. त्यामुळे गेले दोन महिने चौका-चौकातील ...

The signal started, only for two hours | सिग्नल सुरु, फक्त दोन तासापुरते

सिग्नल सुरु, फक्त दोन तासापुरते

Next

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन परिस्थितीत रस्त्यावरील वाहतुकीला निर्बंध घातल्याने रस्ते रिकामे राहिले. त्यामुळे गेले दोन महिने चौका-चौकातील सिग्नल बंदच राहिले होते. पावसाळी वातावरणाचा परिणाम सिग्नलवर होऊन ऐनवेळी ते सुरु करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी सोमवारी सकाळी शहरातील माळकर तिकटी, व्हीनस कॉर्नर चौक, दाभोळकर चौक, ताराराणी चौक असे चार सिग्नल दोन तासांकरिता सुरु करुन चाचणी घेतली. अचानक सिग्नल सुरु झाल्याने शहरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली.

कोरोना सुरु झाला अन् जिल्हा प्रशासनाने रस्त्यावर फिरण्यासाठी निर्बंध आणले. एप्रिलमध्ये लॉकडाऊन केला. त्यामुळे रस्ते सुनसान बनले. अत्यावश्यक सेवेतील वाहनांव्यतिरिक्त रस्ते रिकामेच होते. शहरातील एकूण ३५ सिग्नल बंदच राहिले. दोन महिन्यानंतर सोमवारपासून अनलॉक सुरु झाले. सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत निर्बध शिथील केले. पहिल्याच दिवशी वाहने रस्त्यावर उतरली. ऊन, पावसाचे वातावरण व दोन महिने बंद राहिल्यामुळे सिग्नलवर परिणाम होऊन ऐनवेळी सुरु करण्यात अडचणी येतील. त्यामुळे सोमवारी सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत शहरातील प्रमुख चौक व वर्दळीची ठिकाणे अशा चारही चौकातील सिग्नल सुरु झाले अन्‌ वाहनधारक गोंधळले. सर्वच सिग्नल सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली.

अचानक सिग्नल सुरु झाले, तरीही सिग्नल परिसरात रस्त्याकडेला अनेक चारचाकी वाहने थांबल्याने या प्रमुख मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांची वाहतुुकीच्या कोंडीवर नियंत्रण मिळवताना तारांबळ उडाली.

कोट...

दोन महिने शहरातील सिग्नल बंद आहेत. ऐनवेळी सिग्नल सुरु करताना तांत्रिक अडथळा येऊ नये, यासाठी सोमवारी सकाळी दोन तास प्रमुख चौकांतील सिग्नल सुरु करुन चाचणी घेतली आहे. - स्नेहा गिरी, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा.

फोटो नं. ०७०६२०२१-कोल-ट्रॅफीक सिग्नल०१,०२

ओळ : शहरातील महापालिका चौकातील सिग्नल तब्बल दोन महिन्यांनी सोमवारी चाचणीसाठी सुरु केला अन्‌ वाहनांची कोंडी झाली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: The signal started, only for two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.