काही सवलतीसह ७ जूननंतरही कडक लाॅकडाऊनचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:18 AM2021-06-03T04:18:52+5:302021-06-03T04:18:52+5:30
बंगळुरू येथे आज बुधवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले की, लाॅकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी कोरोनाला रोखण्यासाठी आणखी कोणत्या उपाययोजना करता ...
बंगळुरू येथे आज बुधवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले की, लाॅकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी कोरोनाला रोखण्यासाठी आणखी कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत मी संबंधित सर्वांशी चर्चा करणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निर्यात क्षेत्रातील सर्वांना परवानगी देण्याचा निर्णय मी घेतला आहे. त्यामुळे निर्यात क्षेत्राशी निगडित व्यवसाय सुरू करण्यास गुरुवारपासून परवानगी असणार आहे. राज्याच्या कोरोना तांत्रिक सल्लागार समितीने (टीएसी) राज्यातील पॉझिटिव्हिटीचा दर ५ टक्क्यांपेक्षा खाली आला आणि नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या प्रतिदिन ५000 पेक्षा कमी झाली तरच लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल करावेत, अशी शिफारस सरकारकडे केली आहे.
दरम्यान, राज्यातील लाॅकडाऊनचे निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. मात्र तत्पूर्वी राजधानी बंगळुरूमधील नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या १000 पेक्षा कमी होणे गरजेचे आहे. असे गेल्या ३१ मे रोजी राज्याचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी स्पष्ट केले आहे.