सांकेतिक भाषेसाठी मुक बधीरांचा हुंकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 04:42 PM2019-12-03T16:42:27+5:302019-12-03T16:45:12+5:30

सांकेतिक भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक-कर्ण बधिरांनी निदर्शेने केली. सांकेतिक भाषाचा वापर करत त्यांनी केलेली मागणी लक्षवेधी ठरली.

Silent deaf cries for sign language | सांकेतिक भाषेसाठी मुक बधीरांचा हुंकार

सांकेतिक भाषेसाठी मुक बधीरांचा हुंकार

googlenewsNext
ठळक मुद्देसांकेतिक भाषेसाठी मुक बधीरांचा हुंकारभाषेला अधिकृत दर्जाची मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

कोल्हापूर : सांकेतिक भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक-कर्ण बधिरांनी निदर्शेने केली. सांकेतिक भाषाचा वापर करत त्यांनी केलेली मागणी लक्षवेधी ठरली.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मूक कर्णबधिर असोसिएशनच्यावतीने बुधवारी सांकेतिक भाषा दुभाषिकेला भारतीय भारतीय संसद भाषेला अधिकृत भाषा देण्याच्या या प्रमुख मागणीसाठी मुक कर्ण बधिरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शेने करण्यात आली. मागण्याचे निवदेन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, प्रधान मंत्री कार्यालयाने २८ फेबु्रवारी रोजी सांकेतिक भाषेला संविधानच्या आठवी अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावित केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पत्रसोबत विधान परिषदेचे सदस्य हरिभाऊ राठोड यांनीही याबाबतचा प्रस्ताव दिला आहे.

यावेळी उद्धव पन्हाळकर, अतुल पुणसाळकर, अमेय गवळी, अतुल भाळवणे, गौरव शेलार, अमोल कवाळे, संतोष मिठारी, तेजस मुरगुडे, धीरज कांबळे, प्रियाका महामुनी, जयश्री गवळी उपस्थित होते.

 

Web Title: Silent deaf cries for sign language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.