गारगोटीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:26 AM2021-05-21T04:26:13+5:302021-05-21T04:26:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी, “सध्या उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळण्याची शक्यता कमी झालेली आहे. या स्थितीत नोकरीच्या शोधात वेळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी,
“सध्या उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळण्याची शक्यता कमी झालेली आहे. या स्थितीत नोकरीच्या शोधात वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वयंव्यवसाय सुरु करणे आवश्यक आहे. तरुणांनी मधमाशा पालनासारखा व्यवसाय सुरु केल्यास त्यांची अल्पावधीत प्रगती व आर्थिक स्थैर्य सहजसाध्य आहे. पर्यावरण संवर्धनासह आर्थिक प्रगती मिळवण्यासाठी मधमाशा पालन हा सोनेरी मार्ग आहे” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी व्यक्त केले.
ते येथील कर्मवीर हिरे महाविद्यालयामध्ये जागतिक मधमाशी दिनानिमित्त प्राणीशास्त्र विभाग व अंतर्गत दर्जा हमी कक्ष यांच्यावतीने आयोजित ' मधुमक्षिका पालन ' या विषयावरील राष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्रात बोलत होते.
फोटो
बिपीन जगताप