Kolhapur: हुपरीतील चांदी व्यावसायिकाचा खून, १५ लाखांच्या चांदीसह दागिने लंपास; संशयित भाऊ ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 11:42 AM2024-09-23T11:42:00+5:302024-09-23T11:43:04+5:30

हल्लेखोरांनी दुपारी घरी कोणीही नसल्याचे पाहून त्यांच्यावर धारदार शस्त्राने चार वर्मी घाव घालून निर्घृणपणे खून केला

Silver dealer in Hooper murdered in hupari Kolhapur, jewelery worth 15 lakhs stolen; Suspect brother in custody | Kolhapur: हुपरीतील चांदी व्यावसायिकाचा खून, १५ लाखांच्या चांदीसह दागिने लंपास; संशयित भाऊ ताब्यात

Kolhapur: हुपरीतील चांदी व्यावसायिकाचा खून, १५ लाखांच्या चांदीसह दागिने लंपास; संशयित भाऊ ताब्यात

हुपरी : येथील तरुण चांदी व्यावसायिक ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे (वय ३१ रा. सिल्व्हर झोन वसाहत हुपरी) यांचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याचे रविवारी सायंकाळी उघडकीस आले आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरीच घडली. यावेळी हल्लेखोरांनी कपाटातील सुमारे १५ लाख रुपये किमतीची चांदी व चांदीचे दागिनेही लंपास केले.

याप्रकरणी भाऊ प्रवीण सुकुमार हालुंडे याला संशयित म्हणून हुपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली असून हुपरी व गोकुळ शिरगाव पोलिस या खुनाचा तपास करीत आहेत. महिन्याच्या कालावधीत दुसरा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून समजलेली माहिती अशी. चांदी व्यावसायिक ब्रह्मनाथ हालुंडे हे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सिल्व्हर झोन वसाहतीमध्ये आई- वडिलांसह वास्तव्यास होते. परपेठेतील सराफांच्या मागणीनुसार चांदी दागिने बनवून घेऊन पोहोच करण्याचा त्यांचा व्यवसाय होता. ते अविवाहित असून धार्मिकवृतीचे होते. आई-वडिलांसह ते एकत्रित राहात असले तरीही त्यांचा चांदी व्यवसाय स्वतंत्र होता. त्यांचे मुळगाव जैनवाडी (ता. निपाणी) असून त्यांच्या शेतातील भुईमूग काढणी सध्या सुरू आहे. त्यामुळे आई-वडील शनिवारपासून तिकडे गेल्याने दोन दिवसांपासून ते घरी एकटेच होते.

या संधीचा गैरफायदा घेत अज्ञात हल्लेखोरांनी दुपारी घरी कोणीही नसल्याचे पाहून त्यांच्यावर धारदार शस्त्राने चार वर्मी घाव घालून निर्घृणपणे खून केला. त्यांच्या छातीत खोलवर दोन व मानेवर दंडावर असे घाव घालण्यात आले होते. हल्लेखोरांनी जाताना तिजोरीतील सुमारे १५ लाख रुपये किमतीची चांदी व चांदीचे दागिने लंपास करीत दोन्ही खोलीतील साहित्यही अस्ताव्यस्तपणे विस्कटले आहे.

आई-वडील परतल्यावर खून उघडकीस

मुनीश्री आर्षकीर्तीजी महाराज यांचा ४५ वा वर्षवर्धन हा धार्मिक सोहळा रविवारी यळगूड (ता. हातकणंगले) येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये ब्रह्मनाथ हालुंडे हे सकाळी १० पासून सहभागी झाले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी जेवण करून ते घरी परतले होते. दरम्यानच्या कालावधीत त्यांचा खून झाला. त्यांचे आई-वडील सायंकाळी साडेसहा वाजता जैनवाडी येथून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Web Title: Silver dealer in Hooper murdered in hupari Kolhapur, jewelery worth 15 lakhs stolen; Suspect brother in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.