मंत्री मेटेलिक्स यांची रौप्यमहोत्सवी वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:17 AM2021-07-21T04:17:30+5:302021-07-21T04:17:30+5:30

यांच्याकडे बी. एस्सी.पर्यंतचे शिक्षण घेतले. गोपालदास यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले व आपल्या ओळखीने ‘शब्द’ टाकून, भावासाठी नोकरी शोधून ...

Silver Jubilee of Minister Metallics | मंत्री मेटेलिक्स यांची रौप्यमहोत्सवी वाटचाल

मंत्री मेटेलिक्स यांची रौप्यमहोत्सवी वाटचाल

Next

यांच्याकडे बी. एस्सी.पर्यंतचे शिक्षण घेतले. गोपालदास यांनी त्यांचे

शिक्षण पूर्ण केले व आपल्या ओळखीने ‘शब्द’ टाकून, भावासाठी नोकरी शोधून नियुक्तीपत्र हातात दिले. त्यावेळी त्या तरुणाने भाऊ व वडिलांकडून २-३ महिने स्वतःचा व्यवसाय करून बघतो म्हणून वेळ मागून घेतला. वडिलांनी एकही पैसा कमी न होऊ देण्याच्या बोलीवर ३००० रुपये भांडवल

दिले. ते भांडवल घेऊन, उराशी स्वतःचा व्यवसाय करायचा, ही साहसी जिद्द बाळगून हा तरुण मुंबई येथून पहिला स्क्रॅपचा ट्रक भरतो. त्याच ट्रकमध्ये मालावर झोपून कोल्हापूरपर्यंतचा प्रवास करतो. ही विलक्षण

कथा दुसऱ्या-तिसऱ्या कोणाची नसून मंत्री मेटॅलिक्सचे चेअरमन पुरुषोत्तम मंत्री यांची आहे.

पहिल्या ट्रकमध्ये तोटा झाला; पण हळूहळू नफा मिळवीत त्यांनी कोल्हापूरमध्ये

आपल्या व्यावसायिक जीवनाला सुरुवात केली. अनेक संकटांवर

मात करीत, धडाडीने व आशावादाने आपली व्यावसायिक घोडदौड त्यांनी सुरू ठेवली. व्यवसायासाठी

लागणारी वृत्ती, बाजारपेठांचा अभ्यास, बाजारपेठेतील गरज, मागणी यांचा सखोल अभ्यास करून

सुरुवातीच्या काळात कोल्हापूरमध्ये मोठ्या व चांगल्या प्रमाणात असलेल्या फौंड्री व्यवसायाला लागणारे रॉ मटेरियल पुरविण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. स्वतःच्या व्यवसायात वाढ करावयाची असेल, तर लागणाऱ्या सर्व गोष्टींचा ते सखोल अभ्यास करीत. फौंड्रीला लागणारे रॉ मटेरियल पुरविण्याचा उद्योग चांगल्या स्थितीत होता; परंतु त्यांची धडाडी,

आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने त्यांना गप्प बसू देत नव्हती. त्यामुळेच त्यांनी ‘एम.एम. ऑटोमोबाइल्स’ या नावाने नवीन उद्योग सुरू करून सुझुकी व स्वराज माझदाची डीलरशिप घेतली. व्यावसायिक प्रवास सुरू

असतानाच त्यांनी १९९६ मध्ये ‘मंत्री मेटॅलिक्स’ या उद्योगाचे छोटे रोप लावले आणि आज त्याचा भला मोठा

वटवृक्ष झाला आहे. २५ कामगारांना हाताशी धरून सुरू केलेल्या व्यवसायात आज २००० कामगार काम करतात.

या सर्वांची कुटुंबे त्यावर चालतात, तसेच १०० अधिक सब कॉन्ट्रॅक्टर्सचे मशीन शॉप मंत्री मेटॅलिक्ससाठी काम करतात. मंत्री मेटॅलिक्स सुरू केल्यावर त्यांनी टाटा मोटर्सचे रजिस्ट्रेशन आणि ऑर्डर्स मिळविल्या व कमी वेळेत ऑर्डर पूर्ण करण्याचे दिव्य मंत्री ‘मेटॅलिक्स’ने पार पाडले. त्यामुळे त्यावर्षी टाटा मोटर्सला ३२ लाखांची बचत झाली. याचा मंत्री मेटॅलिक्सलासुद्धा चांगला फायदा झाला.

फ्लाय व्हीलचे उत्पादन करीत असताना त्यांना

असलेला रॉ मटेरियलमधील अनुभव उपयोगी पडला. ऑर्डरचे व्यवस्थित नियोजन करून उत्तम

गुणवत्ता ठेवून विक्रमी वेळेत काम पूर्ण करता आले. टाटा ग्रुपचे काम कायमस्वरूपी मिळाले व उत्तरांचलमध्ये टाटांनी कारखाना सुरू करतेवेळी मंत्री मेटॅलिक्सला ‘टाटा व्हेंडर पार्क’मध्ये कारखाना सुरू करण्याकरिता

आमंत्रित केले. तेथे तीन एकर इंडस्ट्रियल प्लॉट व नऊ कोटींचे भांडवल टाटा कॅपिटलकडून दिले व मंत्री

मेटॅलिक्स प्रा. लि. कारखाना उत्तरांचलला सुरू झाला. येथून अनेक देशी-विदेशी कंपन्यांना पार्टस् पुरविले जातात. टाटा मोटर्स लिमिटेड, अशोक लेलँड, सिम्पसन अँड कंपनी, टाटा कमिन्स लि. स्पाइसर इंडिया लि., कमिन्स इंडिया लि., मान ट्रक्स इंडिया प्रा.लि., इलजीन ऑटोमोटिव्ह, जेसीबी पॉवर सिस्टिम्स आणि परदेशातील कंपन्यांमध्ये मोटरएन फॅब्रिक, हाय- जर्मनी, कमिन्स-यूएसए, जाॅन डिअर-ग्लोबल सप्लाय, आरगो ट्रॅक्टर्स, मोन्टनररी लिफ्ट्स-इटली, एबी व्हाॅल्वो - स्वीडन, लोंबारडिनी, व्हेंच्युअर प्रोडक्टस्‌, रेनाॅल्ट ट्रक्स-फ्रान्स, जनरल मोटर्स यांना पार्टस् पुरविले जातात. एकूण उत्पादनापैकी २५ टक्के उत्पादन निर्यात होते. अमेरिका, जर्मनी, इटली फ्रान्स येथे हे उत्पादन जाते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेत शिकागो येथे मंत्री मेटेलिक्सचे ऑफिस आहे. २००३ मध्ये पहिली सीएनसी मशीन आली

आणि वाढत्या कामाबरोबर त्यांची संख्या आज शंभराहून अधिक आहे. आज कंपनीची वार्षिक उलाढाल ३०० कोटींहून अधिक आहे. मंत्री मेटेलिक्सचे कागलमधील युनिट नंबर दोन हे आधुनिक तंत्राची किमया म्हणावी लागेल.

संपूर्ण प्लांट हा सुंदर, स्वच्छ व संपूर्णपणे ऑटोमॅटिक आहे.

आज करवीरनगरीत आई अंबाबाई, छत्रपती शाहू महाराजांची परंपरा, सोने-चांदीच्या वस्तू, कोल्हापुरी चपला अशा अनेक पारंपरिक वस्तू ज्या कोल्हापूरनगरीचे नाव घेतल्या की डोळ्यासमोर येतात, तेथे मंत्री मेटेलिक्सचे मंत्री परिवार हे नाव घेतल्याशिवाय ही यादी पूर्ण होऊ शकत नाही.

चौकट : १९९९-२००० चा कोल्हापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट उद्योग पुरस्कार मंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मिळाला. फौंड्री रॉ मटेरिअलचा व्यवसाय करीत असताना १९९१ मध्ये

किर्लोस्कर ग्रुप यांनी मंत्री यांना बेस्ट सप्लायर अवाॅर्ड संजय किर्लोस्कर यांच्या हस्ते देऊन गौरविले. जॉन डिअरकडूनही बेस्ट परफॉर्मन्स अवाॅर्ड, ग्लोबल सोर्सिंग मिळविले आहे. मंत्री मेटेलिक्सला २०१०-११ या आर्थिक वर्षाचा उत्कृष्ट निर्यातीबद्दलचा पुरस्कारही मिळाला आहे. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनकडून २०११ चे गैरवचिन्ह, कमिन्स कंपनीकडील नियमित पुरवठ्याबद्दलचे परितोषिक अशा अनेक पारितोषिकांचे मंत्री मेटेलिक्स मानकरी ठरले आहे.

चौकट :

‘शून्यातून विश्व’ निर्माण करताना मंत्री यांनी समाजिक जाणीवही तितकीच प्रखरतेने जोपासली आहे, हे मंत्री मेटेलिक्समार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांतून दिसते. महालक्ष्मी मंदिरातील अन्नछत्र, माले

मुडशिंगी गाव दत्तक घेऊन तेथे राबविलेले अनेक उपक्रम (युनिफाॅर्म, वह्या-पुस्तक वाटप, बेंचिस व कॉम्प्युटरची विद्यार्थ्यांसाठी सोय वगैरे), तसेच गावातील महिलांसाठी स्वयंरोजगार योजना सुरू केली. वारकऱ्यांसाठी अल्पोपाहाराची सोय, कंपनीतील कामगारांच्या मुलांचा गुणगौरव, कामगारांसाठी घेण्यात येणारे ट्रेनिंग प्रोग्राम, त्रैमासिक रक्तदान शिबिरे, विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.

चौकट : व्यवसायाबरोबर कौटुंबिक जबाबदारीही

पुरुषोत्तम मंत्री हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व.. ‘संसार करावा नेटका’ या उक्तीप्रमाणे त्यांनी आपल्या व्यवसायाबरोबर प्रापंचिक जबाबदारीसुद्धा तेवढ्याच समर्थपणे पूर्ण केली, दोन मुली पूजा, अर्चना व एक मुलगा प्रसाद यांचा अभ्यास, खेळापासून ते मुलांना दहावी-बारावीच्या परीक्षेला सोडायला जाण्यापर्यंत त्यांचा सहभाग असायचा, मुलांच्या पुस्तकांना कव्हर लावणे ही कामेसुद्धा स्वतः करीत. त्यामुळेच पूजा बारावी बोर्डात पहिली आली व आर्किटेक्टला गोल्ड मेडल मिळाले. प्रसाद १२ वी बोर्डात तिसरा आला व त्याला यू.डी.सी.टी.मध्ये ॲडमिशन मिळाले आणि २००० मध्ये तो फस्ट क्लासमधून केमिकल इंजिनिअर होऊन मंत्री मेटेलिक्समध्ये रुजू झाला. अर्चनाही इंटिरिअर डिझायनर असून एक आदर्श गृहिणी आहेत. प्रसाद हे इंजिनिअर झाल्यानंतर त्यांनी मंत्री साहेबांना व्यवसायात साथ दिली व

व ‘बाप से बेटा सवाई’ हे दाखवून दिले.

अशोक लेलँड कंपनीमध्ये मंत्री मेटेलिक्सचा एक मोठा लॉट बाजूला काढला होता आणि मेटेलिक्सच्या टेक्निकल विभागाला चर्चेसाठी बोलावण्यात आले होते.

त्यावेळी मंत्री साहेबांनी २-३ महिन्यांपूर्वी कंपनी जॉइन केलेल्या आपले सुपुत्र प्रसाद यांना तिकडे पाठविले व त्यांनी तेथील लोकांशी चर्चा करून आपली बाजू समजावून सांगितली. त्यावर तेथील मुख्य संचालक खुश झाले व त्यांचे शंका-समाधान होऊन

त्यांनी मंत्री मेटेलिक्सला ऑर्डर द्या असा शेरा मारला व त्यानंतर त्यांच्या चारही सेंटरहून आजतागायत ऑर्डर्स मिळत आहेत.

चौकट :

फक्त २५ कामगार १९९६-९७ मध्ये महिन्याचे १०० टन उत्पादन करीत होते. आज ते ५००० मेट्रिक टनावर पोहोचले आहे. प्रसाद यांनी मंत्रीसाहेबांसोबत १०० टनापासून ५००० मेट्रिक टनापर्यंत उत्पादन करण्याचा इतिहास घडविला आहे. अशी वाढ करणारे हे एकमेव युनिट आहे. या त्यांच्या वाटचालीत मंत्रीसाहेबांच्या पत्नी सरलाभाभी यांची सतत साथ लाभली आहे. त्यामुळेच मंत्री साहेबांना हे यश मिळविणे शक्य

झाले. आयुष्यातील

यशस्वी पर्वानंतर आजही वयोमानानुसार असलेल्या शारीरिक व्याधीवर मात करून ते भक्कमपणे मंत्री मेटेलिक्समध्ये आपल्या चिरंजीवाला व सर्व कामगार वर्गाला मार्गदर्शन व पाठिंबा देतात. त्यांच्या सोनेरी संध्याकाळच्या आयुष्याला लाख-लाख शुभेच्छा!

फोटो : २० पुरुषोत्तम मंत्री

Web Title: Silver Jubilee of Minister Metallics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.