सरसकट कर्जमाफी द्या अन्यथा खुर्ची सोडा : सुकाणू समिती नेत्यांचा इशारा

By admin | Published: June 7, 2017 04:24 PM2017-06-07T16:24:17+5:302017-06-07T16:27:15+5:30

दडपशाही कराल तर त्याच भाषेत उत्तर देऊ : संपतराव पवार

Simply give a debt relief or leave the chair: steering committee leaders' warning | सरसकट कर्जमाफी द्या अन्यथा खुर्ची सोडा : सुकाणू समिती नेत्यांचा इशारा

सरसकट कर्जमाफी द्या अन्यथा खुर्ची सोडा : सुकाणू समिती नेत्यांचा इशारा

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0७ : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या या मागणीसाठी बुधवारी कोल्हापूर जिल्हा सुकाणू समितीच्या वतीने शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करू न दिल्याने संतप्त झालेल्या आंदोलन कर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

अल्पभूधारकांना कर्जमाफीचे गाजर दाखवून सरकार शेतकऱ्यांमध्ये फुट पाडत असून सरसकट कर्जमाफी देता येत नसेल तर खुर्ची सोडा. असा इशारा यावेळी समितीच्या वतीने देण्यात आला. कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गेले सात दिवस शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिवसेंदिवस आंदोलनाची तीव्रता वाढ असून शेतकरी आक्रमक झाले आहेत.

सर्वपक्षीय सुकाणू समितीच्या वतीने शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचे नियोजन होते. दहन करण्यासाठी पुतळा घेऊन येतानाच पोलीसांनी तो ताब्यात घेतला. त्यानंतर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने शिवाजी चौक परिसर दणाणून गेला. आंदोलन कर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलीसांनी सर्वांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

संपुर्ण राज्यातील शेतकरी एकसंध झाल्याने सरकार अस्वस्थ झाले आहे, त्यामुळे आंदोलनात फुट पाडण्याचे पाप सुरू असल्याचा आरोप करत माजी आमदार संपतराव पवार म्हणाले, अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन हे फसवे आहे. यातून शेतकऱ्यांचे भले होणार नाही. सात दिवस झाले आंदोलन सुरू असताना सरकार बहेरी असल्यासारखे वागत आहे. पण लक्षात ठेवा गाठ शेतकऱ्यांशी आहे. पोलीसांच्या बळावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर आम्हालाही त्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल, असा इशारा संपतराव पवार यांनी दिला.

‘माकप’चे चंद्रकांत यादव म्हणाले, सरकारचा खरा चेहरा आता शेतकऱ्यांसमोर आला आहे. निवडणूकीत घोषणा करायच्या आणि पाच वर्षे सत्ता भोगायची ही भाजपची जुनी पध्दत आहे. सरकारच्या दडपशाही खपवून घेणार नसून शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका नाहीतर पेशवाईवर हल्लाबोल करावा लागेल.

यावेळी उदय नारकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, अ‍ॅड. माणिक शिंदे, बाबासाहेब देवकर, अतुल दिघे, सुभाष निकम, भारत पाटील, एम. डी. निश्चिते, संभाजी जगदाळे, जनार्दन पाटील, जगन्नाथ कांदलकर, गिरीष फोंडे आदी उपस्थित होते.

शिवसेनेने प्रामाणितकता सिध्द करावी

शिवसेना व भाजप मध्ये मतभेद असल्याचे दाखवत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने पाठींबा दिला असला तरी त्यांनी आक्रमकपणे सरकारविरोधात बाहेर पडले पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याची भावना राज्यात निर्माण होईल. शिवसेनेला प्रामाणिकता सिध्द करण्यासाठी हीच वेळ असल्याचे संपतराव पवार यांनी सांगितले.

 

Web Title: Simply give a debt relief or leave the chair: steering committee leaders' warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.