कोरोनामुळे मिणचेतील पतीपत्नीचा एकाचवेळी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:24 AM2021-05-17T04:24:28+5:302021-05-17T04:24:28+5:30
पेठवडगाव: मिणचे येथील पती पत्नीचा एकाच दिवशी तासाभराच्या अंतराने शनिवारी सायंकाळी कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. अरुण सर्जेराव कांबळे ...
पेठवडगाव: मिणचे येथील पती पत्नीचा एकाच दिवशी तासाभराच्या अंतराने शनिवारी सायंकाळी कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. अरुण सर्जेराव कांबळे (वय ४८) उर्फ के अरुण ,सीमा अरुण कांबळे (४३) अशी मृतांची नावे आहेत.
कोरोनाबाधित दांपत्यावर गेली पंधरा दिवस उपचार सुरू होते. लक्षणे सौम्य आढळल्यावर घरात उपचार घेतले. मात्र अपेक्षित फरक न पडल्यामुळे नातेवाइकांनी
सांगली क्रीडा संकुल कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान दांपत्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. प्रथम पत्नी सीमा यांचा मृत्यू झाला त्यानंतर काहीवेळाने अरुण यांचा मृत्यू झाला. कोविड सेंटरमध्ये दोघेही शेजारी बेडवर औषधोपचार घेत होते.
कोरोनामुळे पत्नीच्या निधन झाल्याच्या धक्क्यातून अरुण यांचा मृत्यू झाल्याची शंका कुटुंबीयांनी व्यक्त केली. कोरोनामुळे एक हसते खेळते कुटुंब उघड्यावर पडले. के अरुण हे ऑर्केस्ट्रा गायक म्हणून करमणुकीची कामे व सामाजिक कार्य करत होते. त्यांच्या पत्नी सीमा या घर, शिवण काम करत होत्या. मुलगा ऋषिकेश हा बीए पहिल्या वर्षांत तर तर मुलगी शिवानी बी काॅमला आहे. त्यांची पुतणी ही कोरोना पाॅझिटिव्ह आहे.
चौकट: बौद्ध समाजाने सामाजिक बांधिलकीतून घरटी आर्थिक मदत जमा करण्याचे नियोजन सुरू केले आहे. यातून कुटुंबाला आर्थिक मदत देऊन त्यांच्या मुलांना सावरण्यासाठी समाज पुढे आला आहे. दोघांच्या शैक्षणिक दायित्व स्वीकारण्याची गरज आहे.
सोबत फोटो : १६अरुण व सीमा कांबळे