जिगरी दोस्तांची झाली नौसेनेत एकाचवेळी भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:23 AM2021-03-25T04:23:22+5:302021-03-25T04:23:22+5:30
येथील शिवराज कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गेल्या वर्षी दोघांचे बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण झाले. दोघेही एकाच वर्गात शिकत होते. श्रेयस ...
येथील शिवराज कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गेल्या वर्षी दोघांचे बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण झाले. दोघेही एकाच वर्गात शिकत होते. श्रेयस कुस्तीपटू तर दयानंद धावपटू असे दोघेही उत्कृष्ट खेळाडू असल्याने दोघांचेही सैन्य भरतीचे लक्ष्य होते. त्यादृष्टीने दोघांनीही अभ्यास आणि शारीरिक कसरतीचा एकत्र सराव केला. कोरोना काळातही दोघांनी कसून सराव केल्याने सैन्य भरतीमध्ये दोघांनाही एकाच वेळी संधी मिळाली.
श्रेयश चौगुले हा श्रीकांत चौगुले या जुन्या काळात गाजलेले मल्ल श्रीकांत चौगुले यांचा मुलगा. मुलाने कुस्तीमध्ये चांगले करिअर करावे यासाठी श्रीकांत चौगुले यांची धडपड होती. दयानंद हिरुगडे हा सावर्डे बुद्रूक येथील महालक्ष्मी हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर मुरगुडूत आत्याकडे संजय मोरबाळे यांच्या घरी राहून शिक्षण घेतले. वडील मंडलिक कारखान्यात बॉयलर अटेंडंट असून दयानंदने बारावीनंतर तासगाव इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत सैनिकी भरतीच्या परीक्षेसाठी कसून अभ्यास केला. यातूनच श्रेयश आणि दयानंद यांनी ऑनलाइन परीक्षा दिली. या परीक्षेतून भारतीय नौसेना दलात (SSR) दोघांचीही भरती झाली. ओडिसामधील चिल्का याठिकाणी फिजिकल टेस्ट झाल्यानंतर दोघांचीही निवड निश्चित झाली. सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी दोघेही नुकतेच रवाना झाले.