सिंधुदुर्ग : विनयभंग प्रकरण : त्या युवकाला कठोर शिक्षा करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:39 PM2018-10-31T12:39:31+5:302018-10-31T12:40:52+5:30

शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी अजित देसाई याला कठोर शिक्षा व्हावी. जेणेकरून अशी विकृती पुन्हा तालुक्यात निर्माण होणार नाही, अशी मागणी दोडामार्ग तालुका यूथ हेल्पलाईन व नारीशक्ती संघटनेच्यावतीने करण्यात आली.

Sindhudurg: Molestation case: The young man should be punished with severe punishment | सिंधुदुर्ग : विनयभंग प्रकरण : त्या युवकाला कठोर शिक्षा करावी

सिंधुदुर्ग : विनयभंग प्रकरण : त्या युवकाला कठोर शिक्षा करावी

Next
ठळक मुद्देविनयभंग प्रकरण : त्या युवकाला कठोर शिक्षा करावीदोडामार्ग तालुका यूथ हेल्पलाईन व नारीशक्ती संघटनेची मागणी

दोडामार्ग : शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी अजित देसाई याला कठोर शिक्षा व्हावी. जेणेकरून अशी विकृती पुन्हा तालुक्यात निर्माण होणार नाही, अशी मागणी दोडामार्ग तालुका यूथ हेल्पलाईन व नारीशक्ती संघटनेच्यावतीने करण्यात आली.

तालुक्यातील एका शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी केर येथील अजित देसाई (२८) या युवकाला पोलिसांनी रविवारी अटक केली होती. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी दोडामार्ग तालुका यूथ हेल्पलाईन व नारीशक्ती संघटनेने पोलीस ठाण्याला भेट देत पोलीस उपनिरीक्षक सुजित घाटगे यांची भेट घेऊन चर्चा केली.

छेडछाड प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी कठोर प्रयत्न करावेत व तालुक्यातील गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. तालुक्यातील विकृत गुन्हेगारीला वेळीच ठेचले पाहिजे. त्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत. अन्यथा वेळप्रसंगी कायदा हातात घेऊ, अशा इशाराही यावेळी देण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक घाटगे यांनी गुन्हेगाराला पाठीशी घातले जाणार नाही, त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

यावेळी दोडामार्ग यूथ हेल्पलाईनचे अध्यक्ष वैभव इनामदार, संजय सातार्डेकर, एकनाथ नाडकर्णी, बाळा नाईक, गुरुदास सावंत, प्रकाश गवस, कानू दळवी, नामदेव धरणे, संतोष नाईक, संदीप गवस, हनुमंत गवस, संजय विरनोडकर, नारीशक्ती संघटनेच्या साक्षी नाईक, विनिता देसाई, मनीषा गवस, मनीषा नाईक, रुपाली धुरी, संगीता पेडणेकर, विनिता गावडे, रेश्मा जाधव, रोहिणी गवस, अश्विनी गवस, श्रध्दा देसाई आदी उपस्थित होत्या.

Web Title: Sindhudurg: Molestation case: The young man should be punished with severe punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.