हातकणंगलेत धारधार शस्त्राने एकाच खून; पोलिस घटनास्थळी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 12:08 IST2024-01-07T12:07:07+5:302024-01-07T12:08:17+5:30
घटनास्थळी डॉगस्कॉड ,फॉरेन्सीक टीम आणि समर्थ रूग्णवाहिकेचे स्वप्नील नरूटे दाखल झाले आहेत.

हातकणंगलेत धारधार शस्त्राने एकाच खून; पोलिस घटनास्थळी दाखल
हातकणंगले - कोरोची रोडवरती रघू जानकी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे भारत पांडूरंग येशाळ वय अंदाजे ४५वर्ष रा. रेणूका झोपडपट्टी, इचलकरंजी यांचा धारधार शस्त्राने खून करणेत आल्याचे रविवारी पहाटे उघडकीस आले. हातकणगले आणि शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी डॉगस्कॉड ,फॉरेन्सीक टीम आणि समर्थ रूग्णवाहिकेचे स्वप्नील नरूटे दाखल झाले आहेत.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रूग्णालय मध्ये हलविणेत आला आहे. मयत भरत येशाळ हा ट्रक मेकॅनिकल असलेने त्याला रात्री १२ वा च्या चे सूमारास ट्रक बंद पडला आहे. दुरुस्तीसाठी यावे असा फोन आलेने तो घरातून गेल्याचे त्यांच्या नातेवाईकानी सांगीतले. त्याला रात्री फोन करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. या खूना गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करणेची प्रक्रिया सुरू आहे.