सिंगल बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:44 AM2021-03-04T04:44:21+5:302021-03-04T04:44:21+5:30

गडहिंग्लज : येथील शिवराज विद्या संकुलाचे सचिव प्रा. अनिल कुराडे यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण अखिल भारतीय टीचर्स वेल्फेअर असोसिएशन, ...

Single news | सिंगल बातम्या

सिंगल बातम्या

Next

गडहिंग्लज : येथील शिवराज विद्या संकुलाचे सचिव प्रा. अनिल कुराडे यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण अखिल भारतीय टीचर्स वेल्फेअर असोसिएशन, बंगळूर व युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका यांच्यातफे मानद डॉक्टरेट (डी. लिट) पदवी जाहीर झाली आहे. शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोंद घेऊन ही पदवी त्यांना देण्यात आली आहे.

* अनिल कुराडे : ०२०३२०२१-गड-०६

२) औरनाळमध्ये व्याख्यानास प्रतिसाद

गडहिंग्लज : औरनाळ येथील पार्वती हायस्कूलमध्ये केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉ. मोनिका पाटील यांनी 'आयुसंवाद' या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी कोविड-१९ याविषयी 'रोल ऑफ आयुर्वेदा इन कोविड-१९' याविषयी मार्गदर्शन करून जनजागृती केली. यावेळी डॉ. सोनाली शुक्ला, मुख्याध्यापक श्रीरंग तांबे, उमेश सावंत, गणपती पाटील आदी उपस्थित होते.

- ३) चंदगडला पाईपलाईन कामास प्रारंभ

चंदगड : येथील नगरपंचायत हद्दीतील प्रथमेशनगर येथे वाढीव पाईपलाईनच्या कामास महिला व बालकल्याण समिती सभापती मुमताजबी मतदार यांच्याहस्ते प्रारंभ झाला. यावेळी नगराध्यक्षा प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, नेक्षदीपा कांबळे, नर्जा नाईकवाडी, बाळू हळदणकर आदी उपस्थित होते.

- ४) श्रीराम पतसंस्थेची सभा उत्साहात

हलकर्णी : नांगनूर येथील श्रीराम पतसंस्थेची २८ वी वार्षिक सभा झाली. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मोकाशी यांनी अहवालवाचन केले. संस्थेला ४ लाख २० हजारांचा नफा झाला असून, सभासदांना ७ टक्के लाभांश देण्याचा निर्णय झाला. यावेळी उपाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्यासह संचालक उपस्थित होते.

- ५) भीमशक्ती संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षपदी कांबळे

गडहिंग्लज : आमरोळी (ता. चंदगड) येथील नयना महादेव कांबळे यांची भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या चंदगड तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी निवड झाली. जिल्हा उपाध्यक्ष परशुराम कांबळे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.

* नयना कांबळे : ०२०३२०२१-गड-०५

- ६) तेजस्विनी शिंदे विद्यापीठात तृतीय

गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयाची विद्यार्थिनी तेजस्विनी गंगाराम शिंदे हिने शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक पटकाविला. तिने गणित विषयात ९४.६४ टक्के गुण मिळविले. तिचा महाविद्यालयातर्फे प्राचार्य मंगलकुमार पाटील यांच्याहस्ते सत्कार झाला.

- ७) घाळी महाविद्यालयात ‘विज्ञान दिन’ साजरा

गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन पार पडला. डॉ. शिवानंद मस्ती यांनी 'वेव्ह मोशन, गुरूत्वाकर्षण, घर्षण दृष्टिसातत्य, डोलकाचे प्रयोग, अतिनील किरणांवरील प्रयोग, न्यूटनच्या नियमांवर आधारित प्रयोग आणि त्यामागील शास्त्रीय तत्त्वे व त्यांचे उपयोजन कसे केले जाते, याची माहिती दिली. अध्यक्षस्थानी प्राचार्य मंगलकुमार पाटील होते. डॉ. आर. एस. सावंत यांनी स्वागत केले. ए. एस. मगर यांनी आभार मानले.

Web Title: Single news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.