सिंगलसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:46 AM2021-02-06T04:46:02+5:302021-02-06T04:46:02+5:30

नूल : नूल (ता. गडहिंग्लज) येथील प्रा. महेश शामराव कदम यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या गडहिंग्लज तालुका उपाध्यक्षपदी निवड ...

For singles | सिंगलसाठी

सिंगलसाठी

Next

नूल : नूल (ता. गडहिंग्लज) येथील प्रा. महेश शामराव कदम यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या गडहिंग्लज तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली. जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांनी निवडीचे पत्र दिले. यावेळी मारुती राक्षे, संदीप नाथबुवा, अनिल खोत, आशिष साखरे, कुमार देसाई उपस्थित होते.

* महेश कदम : ०५०२२०२१-गड-०५

-----------------------------

शोभा नंदनवाडे यांचे यश

नूल : नूल (ता. गडहिंग्लज) येथील महिला सायकलपटू शोभा वसंत नंदनवाडे यांनी अहमदनगर येथील सायकलिंग क्लबतर्फे आयोजित राज्यस्तरीय ड्यूथ लॉन (७०.३) स्पर्धेत महिला गटात तृतीय क्रमांक पटकाविला. ७०.३. कि.मी. अंतर त्यांनी ७ तास ५ मिनिटे ४६ सेकंदांत पार केले. स्पर्धेत राज्यातील ७६ स्पर्धकांनी भाग घेतला.

कल्याणी फिरोदिया यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. त्यांना आशिष रावळू, पंकज रावळू यांचे मार्गदर्शन लाभले.

* शोभा नंदनवाडे : ०५०२२०२१-गड-०६

Web Title: For singles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.