सिंगलसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:20 AM2021-02-08T04:20:38+5:302021-02-08T04:20:38+5:30

गडहिंग्लज : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील बजरंग सेवा संस्थेतर्फे १२ टक्के इतके उच्चांकी लाभांश वाटप करण्यात आले. गडहिंग्लज तालुक्यातील ...

For singles | सिंगलसाठी

सिंगलसाठी

Next

गडहिंग्लज : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील बजरंग सेवा संस्थेतर्फे १२ टक्के इतके उच्चांकी लाभांश वाटप करण्यात आले. गडहिंग्लज तालुक्यातील सेवा संस्थांमध्ये हा सर्वाधिक लाभांश आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संदीप देसाई यांनी दिली.

ज्येष्ठ सभासद अशोक पाटील, बाळेश गुंडकल्ली, शंकर खवरे, मारूती जत्राटे, काशिनाथ सुतार, शंकर घबाडे यांच्या हस्ते लाभांश वितरण झाले. यावेळी अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, किरण धनवडे, काशिनाथ संकेश्वरी, भीमगोंडा देसाई, अ‍ॅड. संजय देसाई, उदयकुमार देसाई, प्रकाश हरगापुरे, अरूण लाटकर, जयश्री घबाडे, आण्णासाहेब पाटील, रमेश संकपाळ, किरण शिंदे आदी उपस्थित होते.

-------------------------------------------

२) गडहिंग्लज हायस्कूलमध्ये सत्कार

गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थी वसतिगृहाचे नूतन अधीक्षक तुकाराम भोसले व माजी विद्यार्थी आनंदा तोडकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चित्रकला स्पर्धेतील यशाबद्दल साक्षी मुरगी हिचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. एन. देसाई होते. व्ही. आर. पालेकर यांनी सूत्रसंचालन केले तर एस. डी. कांबळे यांनी आभार मानले.

-------------------------------------------

३) घाळी महाविद्यालयाला कर्नल होल्ला यांची भेट

गडहिंग्लज : महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग आॅफिसर कर्नल आर. बी. होल्ला यांनी येथील डॉ. घाळी महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटला सदिच्छा भेट दिली. दरम्यान, तीन दिवशीय प्रशिक्षण शिबिरात सुभेदार पांडुरंग कुडचीकर व हवालदार अंकुश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रा. अश्विन गोडघाटे यांनी आभार मानले. यावेळी अनिकेत चव्हाण, मानस शेरवी, अनुसया सुतार यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: For singles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.