सिंगलसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:24 AM2021-03-05T04:24:15+5:302021-03-05T04:24:15+5:30
सिंगलसाठी निडसोशीमध्ये महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रम संकेश्वर : निडसोशी (ता. हुक्केरी) येथील दुरदुंडेश्वर मठात २ मार्च ते १३ मार्चअखेर महाशिवरात्रीनिमित्त विविध ...
सिंगलसाठी
निडसोशीमध्ये महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रम
संकेश्वर : निडसोशी (ता. हुक्केरी) येथील दुरदुंडेश्वर मठात २ मार्च ते १३ मार्चअखेर महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मठाधिपती पंचम् श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली २ ते ९ मार्चअखेर प्रवचन, कोरोना योद्ध्यांचा सत्कार तर ११ मार्चला चांदीच्या रथाची मिरवणूक, १२ मार्च महाप्रसाद व १३ मार्चला कुस्ती स्पर्धा होतील.
गडहिंग्लजमध्ये आज विविध स्पर्धा
गडहिंग्लज : येथील कला महाविद्यालय व दि प्रियदर्शिनी महिला सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी १० वाजता जागतिक महिला दिनानिमित्त पाककला, रांगोळी व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. रांगोळी स्पर्धा माध्यमिक विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थिनी व खुल्या महिला अशा तीन गटात होतील. निबंध पाठविण्याची अंतिम मुदत शनिवार (६) अखेर आहे.
‘शिवराज’मध्ये वनस्पती ओळख उपक्रम
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात वनस्पती व विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘ओळख वनस्पतींची’ उपक्रम पार पडला. अॅड. दिग्विजय कुराडे यांच्याहस्ते उपक्रमाचे उद्घाटन झाले. प्रा. संकेत पाटील यांनी ‘बारतोंडी’ वनस्पतींची माहिती दिली. यावेळी प्राचार्य एस. एम. कदम, किशोर अदाटे, व्ही. एम. देशमुख, प्रवीण यादव आदी उपस्थित होते.
कोरोनामुळे खेतोबा देवाची महाशिवरात्री यात्रा रद्द
आजरा : महाशिवरात्रीनिमित्त आजरा तालुक्यातील चितळे भावेवाडीपैकी राई येथील खेतोबा देवाची ११ व १२ मार्चला होणारी यात्रा व महाप्रसाद कार्यक्रम कोरोनामुळे रद्द केल्याची माहिती पुजारी शंकर विश्राम डवरी यांनी दिली. यात्रेला आजरा, गडहिंग्लज, चंदगड, बेळगाव, गोव्यासह पंचक्रोशीतील भाविक गर्दी करतात.