सिंगलसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:22 AM2021-03-18T04:22:52+5:302021-03-18T04:22:52+5:30
गडहिंग्लज : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील यंग स्टार कॉर्नर ग्रुपतर्फे ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते सतीश तुकाराम पेडणेकर यांचा सत्कार करण्यात ...
गडहिंग्लज : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील यंग स्टार कॉर्नर ग्रुपतर्फे ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते सतीश तुकाराम पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनिल डवरी, उपाध्यक्ष संतोष पडवळे, मनोहर इंजल, नितीन पडवळ, रामचंद्र इंजल, मारुती पोटे, विठ्ठल पेडणेकर, पंकज भोगूलकर, शिवाजी पडवळे, रामचंद्र आसले, प्रमोद निकम, प्रशांत गोरे, उत्तम इंजल आदी उपस्थित होते.
२) नेसरी येथे अल्बमचे अनावरण
गडहिंग्लज : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे सोनाई फिल्म प्रॉडक्शननिर्मित ‘पाहता क्षणी’ या प्रेमीगीताच्या अल्बमचे अनावरण डीवायएसपी गणेश इंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी दिलखुश सावंत, सूरज केसरकर, राजकुमार पाटील उपस्थित होते. संदीप पाटील यांनी स्वागत केले. किसन धांडे यांनी सूत्रसंचलन केले.
३) महागावच्या विद्यार्थ्यांची बँकेला भेट
गडहिंग्लज : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील राजा शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी बँक ऑफ बडोदाला भेट दिली. महागाव शाखा व्यवस्थापक विनायक यादव, मनोहर पेडणेकर, अशोक शिंगटे यांनी दैनंदिन कामकाजाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी विभागप्रमुख प्रा. किशोर पाटील, प्रा. डी. जी. कापुरे, प्रा. वैशाली पाटील उपस्थित होते.
४) गडहिंग्लजला ग्राहक दिन
गडहिंग्लज : ग्राहक संरक्षण परिषदेच्या येथील शाखेतर्फे जागतिक ग्राहक दिन पार पडला. यावेळी प्रदेश सचिव विश्वास पोवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास गडहिंग्लज तालुकाध्यक्ष विनय पाटील, आजरा तालुकाध्यक्ष सतीश पाटोळे, सेवानिवृत्त कॅप्टन धोंडीबा हळदकर, मुख्याध्यापक आनंदराव रेडेकर उपस्थित होते.
५) अत्याळ येथे सैनिक संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन
गडहिंग्लज : अत्याळ येथे सुरू करण्यात आलेल्या आजी-माजी सैनिक संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन पं.स. सदस्य प्रकाश पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ऑननरी कॅप्टन सर्जेराव पाटील, एस. आर. पाटील, शैलेश पाटील, ईश्वर कांबळे यांची भाषणे झाली. यावेळी सरपंच संजीवनी माने, उपसरपंच अंजना पाटील, राकेश घोरपडे, धोंडीबा हळदकर, माधुरी मोहिते, अनिता घोरपडे, तानाजी मोहिते आदी उपस्थित होते.
६) प्राणिमित्रांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
गडहिंग्लज : येथील प्राणिमित्र संघटनेतर्फे बैलगाडीद्वारे ऊस वाहतुकीसंदर्भात प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात, ऊसतोडणी हंगामात दर दोन महिन्यांनी बैलांचे आरोग्य शिबिर घ्यावे, चढावाच्या ठिकाणी बैलगाडी ओढण्यासाठी कारखान्यातर्फे ट्रॅक्टरचा वापर करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी पांडुरंग करंबळकर, तानाजी कुरळे, गणपतराव पाटोळे, बसगोंडा पाटील उपस्थित होते.
७) गडहिंग्लजला ‘मनसे’ सभासद नोंदणीस प्रारंभ
गडहिंग्लज : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या येथील शाखेतर्फे सभासद नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, तालुकाध्यक्ष शिवानंद मठपती, शहराध्यक्ष अविनाश ताशीलदार, महिला शहराध्यक्षा प्राजक्ता पाटील, प्रभात साबळे, अमित चौगुले, विनायक इंदूलकर, भय्या पाटील, कुणाल हजारे, संदीप कुरबेट्टी, विशाल हजारे उपस्थित होते.