सिंगलसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:33 AM2020-12-30T04:33:14+5:302020-12-30T04:33:14+5:30
गडहिंग्लज : शहरातील शिवराज महाविद्यालयात शनिवारी (दि. २) दुपारी चार वाजता कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्राचार्य डॉ. ...
गडहिंग्लज : शहरातील शिवराज महाविद्यालयात शनिवारी (दि. २) दुपारी चार वाजता कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांचे ‘कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन व कार्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी दिली.
----------------------------
२) अजळकर व शिरहट्टी यांची निवड
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाकडील डॉ. बाळासाहेब अजळकर यांना ''''कर्मवीर गुणवंत शिक्षक'''' पुरस्कार, तर सचिन शिरहट्टी यांची ''''गुणवंत कर्मचारी पुरस्कारासाठी'''' निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. एम. एम. कदम यांनी दिली.
----------------------------
२) ‘शिवराज’तर्फे अरुण लाड यांचा सत्कार
गडहिंग्लज : शिक्षण हाच सामान्यांच्या जीवनाचा मुख्य आधार आहे. त्यामुळे शिक्षण वाचविण्याचा आणि वाढविण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. अन्यथा समाजातील सामान्य घटक शिक्षणापासून वंचित राहील, अशी खंत आमदार अरुण लाड यांनी व्यक्त केली.
शिवराज विद्या संकुलातर्फे आमदार लाड यांचा संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. सुरेश कुराडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे सचिव प्रा. अनिल कुराडे, अॅड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य एस. एम. कदम, राजशेखर यरटे, इलियास बार्देस्कर, आदी उपस्थित होते. प्रा. तानाजी चौगुले यांनी प्रास्ताविक केले. बसवराज आजरी यांनी आभार मानले.