सिंगलसाठी सिंगलसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:50+5:302021-06-17T04:16:50+5:30
गडहिंग्लज : अडकूर बसस्टॉप ते शिवाजी चौकापर्यंतच्या बाजारपेठ रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी आमदार राजेश पाटील यांच्या फंडातून ४० लाखांचा निधी ...
गडहिंग्लज :
अडकूर बसस्टॉप ते शिवाजी चौकापर्यंतच्या बाजारपेठ रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी आमदार राजेश पाटील यांच्या फंडातून ४० लाखांचा निधी मिळाला. दरवर्षी पावसाळ्यात गावातील या मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य होत असे. गडहिंग्लज बाजार समितीचे अध्यक्ष अभय देसाई यांनी आमदार पाटील यांच्याकडून हा निधी मिळविला. त्यातून बाजारपेठसह मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याने अडकूर पंचक्रोशीत समाधान व्यक्त होत आहे.
---------------------
२) गडहिंग्लज कोविड सेंटरला युनिव्हर्सलकडून मदत
गडहिंग्लज :
गडहिंग्लज नगरपालिका कोविड सेंटर आणि राज ठाकरे कोविड सेंटरला येथील युनिव्हर्सल फ्रेंडस् सर्कलतर्फे मदत करण्यात आली. रुग्ण व कर्मचाऱ्यांसाठी हँडवॉश, ओडोमास व शेंगदाणा चिक्कीचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गायनाचा कार्यक्रमही सादर केला. यावेळी संजय शिवबुगडे, संदीप मिसाळ, सुनील गुरव, सतीश सुतार, श्रीनिवास वेर्णेकर, बाळासाहेब पोतदार आदी उपस्थित होते.
-------------------
३) कार्वे येथे कोरोना वीरांचा सत्कार
गडहिंग्लज :
कार्वे (ता. चंदगड) येथील देव कलमेश्वर सेवा संस्था ग्रामपंचायत व प्राथमिक शिक्षक समिती चंदगड तालुकाध्यक्ष धनाजी पाटील यांच्या सहकार्याने पोलीस पाटील, आरोग्यसेविका, आशासेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव झाला. यावेळी सरपंच जोतिबा आपके, ग्रामसेवक श्रीधर भोगण, नामदेव पाटील आदी उपस्थित होते.
-------------------
४) नेसरी व शिप्पूरतर्फ नेसरीसाठी १४ लाखांचा निधी
नेसरी : जनसुविधा, नागरी सुविधा व दलितवस्ती योजनेमधून नेसरी व शिप्पूर तर्फ नेसरीसाठी १४ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पं. स. सदस्य विद्याधर गुरबे यांनी दिली. .
शिपूर तर्फ नेसरीत गावांतर्गत रस्ते तर नेसरीमध्ये अंगणवाडी इमारत बांधणे या कामांकरिता हा निधी खर्ची पडणार आहे. या कामांना अनुक्रमे ५ व ९ लाख असे मिळून १४ लाख रुपये मंजूर झाले आहेत.